अहमदनगर Live24 टीम, 08 नोव्हेंबर 2021 :-  लॅटिन अमेरिकन देश ब्राझीलमध्ये एका महिलेने आपल्या पतीला ‘कुत्रा’ बनवून रेल्वे स्टेशनवर फिरत असल्याचे विचित्र प्रकरण समोर आले आहे. या महिलेचे नाव लॉना काजकी असून तिच्या पतीचे नाव आर्थर ओ उर्सो आहे.

लॉनाने तिच्या पतीला कुत्र्यासारखे कपडे घातले आणि त्याच्या गळ्यात एक पट्टा बांधला आणि त्याला गर्दीच्या स्टेशनवर नेले. या जोडप्याचा दावा आहे की, कुत्र्याप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी जाण्याने सेक्सची इच्छा वाढते.

या कपड्यांमध्ये जाऊन या जोडप्याने कामवासना वाढवण्याचा प्रयत्न केला. संपूर्ण कापड चामड्याचे होते आणि त्याला एक साखळी जोडलेली होती. यादरम्यान दोघांनी स्टेशनवर फोटोशूटही केले.

एका फोटोमध्ये पती आर्थर गळ्यात साखळीचा पट्टा बांधून त्याला ओढताना दिसत आहे. या जोडप्याचे विचित्र वागणे पाहून लोकांना आश्चर्य वाटले. लोक त्यांच्याकडे कसे टक लावून बघत आहेत हे फोटोत दिसत आहे.

‘आम्हालाही अनेकांनी त्रास दिला’ :- आर्थर म्हणाले, ‘पोशाख पाहून लोक आश्चर्यचकित झाले. अनेकांनी आम्हाला त्रासही दिला. या जोडप्याची कामवासना स्टेशनपर्यंत थांबली नाही. ते इतर सार्वजनिक ठिकाणी गेले.

यामध्ये मार्केट आणि बेकरीचा समावेश आहे. एका छायाचित्रात आर्थर सँडल घातलेला दिसत आहे. आर्थरने दावा केला की हे एक वेगळ्या प्रकारचे साहस होते. याआधीही पतीला कुत्रा बनवण्याच्या घटना जगातील इतर देशांमध्ये घडल्या आहेत.

कॅनडामध्ये आणखी एका महिलेला पोलिसांनी दंड ठोठावला आहे. या महिलेने पतीला साखळीने बांधून रस्त्यावर फिरायला नेले होते.

महिलेने लोकांना सांगितले की ती तिच्या ‘कुत्र्याला’ घेऊन फिरायला बाहेर गेली होती. तथापि, प्रत्येकजण पतीला कुत्रा म्हणून फिरवण्याच्या कल्पनेशी सहमत नाही. कामवासना वाढवण्यासाठी अशी कामगिरी योग्य नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.