Voluntary Retirement Scheme : जर एखाद्या कर्मचाऱ्याला (Employees) सेवानिवृत्ती (Retirement) कालावधीपुर्वी स्व:ताच्या इच्छेने सेवानिवृत्ती घ्यायची असेल तर ती त्याला घेता येऊ शकणार आहे. स्वेच्छा सेवानिवृत्ती दोन प्रकारे मिळू शकते.

यामध्ये कर्मचारी स्वतः स्वेच्छा सेवानिवृत्तीसाठी अर्ज (Application) करतो किंवा कंपनी ही योजना लागू करते. त्याचबरोबर एखादी कंपनी फक्त अपवादात्मक परिस्थितीत स्वेच्छा सेवानिवृत्ती योजना लागू करते.

VRS म्हणजे काय

– VRS म्हणजे स्वैच्छिक सेवानिवृत्ती योजना. या योजनेअंतर्गत कर्मचारी निवृत्तीच्या तारखेपूर्वी निवृत्त होऊ शकतो. ही योजना खाजगी (Private Company)आणि सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमध्ये लागू आहे. काही कंपन्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्यासाठी ही योजना राबवतात. 

VRS कोण घेऊ शकते

स्वेच्छानिवृत्ती योजनेंतर्गत सेवानिवृत्ती घेणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठीही नियम (Rule) करण्यात आले आहेत. या योजनेचा लाभ अशा कर्मचाऱ्यांना मिळू शकतो ज्यांचे वय 40 वर्षांपेक्षा जास्त आहे किंवा ज्यांनी 10 वर्षे सेवा केली आहे. 

कंपन्यांचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी VRS योजनेचा लाभ घेऊ शकतात. परंतु खुद्द सहकारी संस्थेच्या संचालकांना या योजनेचा लाभ घेता येत नाही. नवीन कर्मचारी देखील या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत.

कंपन्या VRS देखील देऊ शकतात
कंपन्या VRS योजना देखील लागू करू शकतात आणि त्यांच्या कर्मचार्‍यांना सेवानिवृत्त करू शकतात. तथापि, कंपन्या हा नियम केवळ विशेष परिस्थितीत लागू करू शकतात. 

सार्वजनिक विभागातील उपक्रमांना कर्मचाऱ्यांना व्हीआरएस देण्यापूर्वी सरकारची परवानगी घ्यावी लागते. खाजगी कंपन्यांसाठी हे आवश्यक नाही. खाजगी कंपन्या स्वतःचे नियम बनवतात. 

काय आहे व्हीआरएस घेण्याचा नियम –
एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याला व्हीआरएस घ्यायचा असेल, तर त्याला 3 महिन्यांपूर्वी नियुक्ती करणाऱ्या अधिकाऱ्यांना नोटीस द्यावी लागते. VRS मधून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्याच्या जागी दुसरी नियुक्ती केली जाणार नाही. 

नोटीसनंतर, कर्मचाऱ्याने हे स्पष्ट केले पाहिजे की त्याने पात्रता सेवा पूर्ण केली आहे. त्यानंतर VRS घेता येईल. व्हीआरएसची प्रक्रिया पारदर्शक असायला हवी आणि अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार कर्मचार्‍यांना देण्यात यावा.

VRS घेण्याचे फायदे-
जर एखाद्या कर्मचाऱ्याने VRS घेतले तर त्यामागे काहीतरी कारण असावे. VRS घेण्याचे अनेक फायदे आहेत. 

  • कर्मचाऱ्यांना कंपनीच्या धोरणानुसार पीएफ, ग्रॅच्युइटी आणि देय रक्कम मिळते.
  • एकरकमी रक्कम मिळाल्याने कर्मचारी ती इतर कामासाठी वापरू शकतो.
  • VRS अंतर्गत मिळणारी 5 लाख रुपयांपर्यंतची रक्कम करमुक्त आहे. ज्या वर्षी नुकसान भरपाई मिळाली त्या वर्षी दावा केला जाऊ शकतो

VRS चे तोटे-
जरी कर्मचारी स्वतःच्या इच्छेने VRS घेतो किंवा कंपनी काही कारणास्तव VRS नियम लागू करते. दोन्ही परिस्थितींमध्ये त्याचे काही फायदे आहेत आणि काही तोटेही. 

  • व्हीआरएस घेतल्याने कर्मचाऱ्यांना अनेक प्रकारे भत्त्यांपासून वंचित ठेवले जाते.
  • पगाराच्या नियमानुसार आयकर भरावा लागेल
  • कर्ज घेतले असेल तर ते वेळेपूर्वी भरावे लागेल.
  • VRS घेणारा कर्मचारी सेटलमेंटला आव्हान देऊ शकत नाही

व्हीआरएस घेतल्यानंतर कर्मचारी दुसरे कामही करू शकतो. तुम्हाला त्याच कंपनीत नोकरी करायची असेल तर VRS घेतल्यापासून 90 दिवसांच्या आत अर्ज करावा लागेल.