Ahmednagar News : घराजवळ असलेल्या ओढ्याला आलेल्या पुरच्या पाण्यात एक आठ वर्षाची मुलगी वाहून गेली होती. दरम्यान तिचा शिवारातील एका पाझर तलावात तिचा मृतदेह आढळून आला आहे.

ही दुर्घटना पाथर्डी तालुक्यातील करोडी या गावात घडली आहे. मयुरी रावण भोसले असे मृत मुलीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, पाथर्डी तालुक्यातील भोसले कुटुंबीय करोडी शिवारात डोंगर परिसरात रहाते.

यांच्या घराच्या शेजारीच एक ओढा असून, जोराचा पाऊस आल्याने ओढाला पूर आला होता. पाण्याने भरून गेला. घराजवळ मयुरी ही ओढ्यानजीक असताना आलेल्या पाण्यात वाहून गेली.

यावेळी तिचे वडील कामाला गेले होते तर आई शेळ्या चरण्यासाठी गेली होती, त्यावेळी मयुरी व तिची एक बहीण घरी होती. सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास अचानक जोराचा पाऊस झाला,

त्या पावसाने ओढा ओसंडून वाहू लागला त्याच दरम्यान या पावसाच्या पाण्यात मयुरी वाहून गेली. त्यानंतर रात्रभर घरच्यांनी व नातेवाईकांनी तिचा शोध घेतला.

मात्र, ती आढळून आली नाही. दरम्यान सकाळी नऊ वाजता करोडी गावच्या शिवारातील पाझर तलावात मयुरी हिचा मृतदेह तरंगल्याचे निदर्शनास आले.