Havaman Andaj : सध्या सम्पूर्ण देशात फेंगल चक्रीवादळाची चर्चा सुरु आहे. हे चक्रीवादळ देशातील अनेक राज्यांमध्ये धुमाकूळ घालत आहे. याचा सर्वाधिक प्रभाव हा तामिळनाडू आणि पुद्दुचेरीच्या किनारपट्टी भागातील कराईकल आणि महाबलीपुरम येथे पाहायला मिळाला.
हे वादळ नुकतेच या भागाला धडकले आहे. त्यामुळे त्या भागात काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे. अनेक भागात चक्रीवादळामुळे अति मुसळधार पाऊस होत आहे. या चक्रीवादळाचा अद्याप पर्यंत महाराष्ट्राला कोणताच फटका बसलेला नाही. पण आगामी काळात याचा महाराष्ट्रालाही फटका बसणार आहे.
हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे त्याचा परिणाम राज्यातील मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये पाहायला मिळणार आहे. हवामान खात्यातील तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे याचा प्रभाव सोमवार, मंगळवार आणि बुधवारी पाहायला मिळणार आहे. राज्यातील काही भागात या वादळाच्या प्रभावामुळे पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
आता आपण या चक्रीवादळाचा प्रभाव राज्यातील कोणत्या जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळणार, कोणत्या जिल्ह्यात मुसळधार पाऊस होणार, यासंदर्भात हवामान खात्याने नेमकी काय माहिती दिली आहे? याबाबत थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. IMD ने सांगितल्याप्रमाणे, आज दोन डिसेंबर 2024 रोजी अर्थातच सोमवारी सिंधुदूर्ग, कोल्हापूर,
सांगली, सोलापूर आणि धाराशिव या जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. तसेच उद्या 3 डिसेंबर 2024 ला अर्थातच मंगळवारी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
खरे तर गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात थंडीची तीव्रता वाढली आहे. दिवसेंदिवस महाराष्ट्रातील थंडीचे प्रमाण हे वाढत असून राज्यातील अनेक भागांमध्ये बोचऱ्या थंडीचा अनुभव येतोय. या कडाक्याच्या थंडीमुळे राज्यातील शेती पिकांना मोठा आधार मिळाला असून अनेक भागातील शेती पिके यामुळे चांगलीचं बहरली आहेत.
पण बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या नव्या चक्रीवादळाचा फटका महाराष्ट्राला बसणार असून यामुळे शेती पिकांना नक्कीच धक्का बसू शकतो. यामुळे बंगालच्या उपसागरातील या चक्रीवादळामुळे शेतकरी बांधव त्रस्त झाले आहेत.