हवामान

Havaman Andaj : थंडीचा कडाका ! आता ‘सुपर एल-निनो’ सक्रिय होऊन पुढील उन्हाळा व पावसाळाही…

Published by
Ahmednagarlive24 Office

Havaman Andaj : यंदा विविध वादळ, चक्रीवादळे आदींमुळे वर्षभर वातावरण विषम पाहायला मिळाले. हिवाळा सुरु होऊनही कधी धुके, तर कधी ढगाळ वातावरण तर कधी गारपीट असे वातावरण पाहायला मिळाले.

दरम्यान आता राज्यात कडाक्याची थंडी पडेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. याचे कारण असे की, उत्तर भारतात सलग पश्चिमी चक्रवात येत असल्याने काश्मीर, लेह, लडाख परिसरात हिमवृष्टी सध्या सुरु आहे. त्यामुळे होत आहे.

धुकं जाऊन ऊन पडणार

मंगळावर, बुधवारी अनेक भागात दाट धुके होते. परंतु ८ डिसेंबरपासून ढगाळ वातावरण पूर्णपणे निवळणार असून ऊन पडेल. त्यानंतर लगेच थंडीला सुरवात होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आदी भागात ७ डिसेंबरपर्यंत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता परंतु ८ डिसेंबरपासून या भागातही स्वच्छ वातावरण होईल व थंडीला सुरुवात होईल असे म्हटले आहे.

११ ते १३ डिसेंबरपर्यंत महाराष्ट्रात पावसाचा अंदाज खरा ठरणार का?

अरबी समुद्राजवळ भूभागावरील कमी दाबाचे क्षेत्र हे पश्चिमेकडे सरकून समुद्रातच विरळण्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे. यामुळे ११ ते १३ डिसेंबरपर्यंत महाराष्ट्रात जो पावसाचा अंदाज वर्तवला आहे ती शक्यताही आता राहणार नाही असे म्हटले आहे.

त्यामुळे ११ ते १३ डिसेंबरपर्यंत महाराष्ट्रात पावसाचा अंदाज वर्तवला होता तो आता खोटा ठरण्याची शक्यता आहे.

आता चार महिने ‘सुपर एल-निनो’ सक्रिय, उन्हाळ्यासह पावसाळाही सामान्य

भारतीय किनारपट्टीवर तयार झालेले मिचाँग चक्रीवादळ समुद्रातून जमिनीवर आले आहे. त्यामुळे आता या वादळाची तीव्रता घटली आहे. आता मिचाँग वादळाचा प्रभाव संपल्यानंतर पुढील ४ महिने सुपर एल-निनाचा प्रभाव राहील त्यामुळे आगामी उन्हाळा आणि पावसाळाही सामान्यच राहील असे सांगितले जात आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office