हवामान विभागाने रेमल चक्रीवादळाचा अंदाज वर्तवलेला होता. त्यानुसार त्याच्या तीव्रतेबाबत इशाराही दिलेला होता. त्यांसुर हे चक्रीवादळ १२० किमी प्रतितास वेगाने बांगलादेश आणि प. बंगालच्या किनारपट्टीवर मध्यरात्रीनंतर धडकले.
या वादळाने रविवारी मध्यरात्रीनंतर मोठा विनाश केला असल्याचे वृत्त आहे. या चक्रीवादळाच्या कहरामुळे बांगलादेशात शेकडो गावे पाण्याखाली गेले आहेत. यात जवळपास १० जण ठार झाले असल्याची माहिती समजली आहे. या वादळाने वीजपुरवठा खंडित झाला आहे.
दीड लाख लोकांना याचा फटका बसला असल्याचे वृत्त आहे. वादळाचा वे इतका होता की, १५ हजार वृक्ष मुळासकट उन्मळून पडले असून घरांचे मोठे नुकसान झाले आहे. विमान आणि रेल्वेसेवेवरही मोठा परिणाम झाला आहे.
‘रेमल’ सोमवारी सकाळी कमकुवत झाले असून यामुळे आलेल्या वादळी वारे आणि मुसळधार पावसाचा फटका बांगलादेशातील अनेक भागांना बसलाय. ग्रामीण वीज प्राधिकरणाने ‘रेमल’चे नुकसान कमी करण्यासाठी किनारपट्टी भागातील दीड लाख लोकांची वीज खंडित केली होती.
‘रेमल’ नावाची कथा –
बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेल्या चक्रीवादळाला ‘रेमल’ हे नाव ओमानने सुचवले आहे, ज्याचा अरबी भाषेत अर्थ ‘वाळू’ असा होतो.
वादळानंतर ठरेल मॉन्सूनची पुढील दिशा
वादळी प्रणालीमुळे चाल मिळाल्याने नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) वाटचाल कायम ठेवली आहे. रविवारी (दि.२६ मे) बंगालच्या उपसागराच्या मध्य आणि ईशान्य भागात मॉन्सूनने प्रगती केली. वादळी प्रणाली निवळल्यानंतर मॉन्सूनच्या पुढील वाटचालीची दिशा ठरणार आहे. यातच ३१ मेपर्यंत मॉन्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.