यंदा मान्सून फारच कमी बरसला. अनके ठिकाणी सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस झाला. याचे कारण म्हणजे एल निनो. एल निनो वादळाने यंदा पाऊस कमी पडला. परंतु आता याह परिणाम येणाऱ्या थंडीवरही होणार आहे. जागतिक हवामान संघटन (डब्ल्यूएमओ) व अमेरिकन हवामान संस्था एनओएएन यांनी याबाबत एक भाकीत केले आहे.
त्यांच्या म्हणण्यानुसार उत्तर गोलार्धात एल निनो मे २०२४ पर्यंत सक्रिय राहण्याची आहे. परिणाम सागरी पृष्ठभागाचे तापमान सरासरीहून १.३ अंशापर्यंत जास्त असेल. सागरी तापमानातील इतकी वाढ केब्रुवारी- एप्रिल २०१६ नंतर पहिल्यांदा नोंदवली गेली आहे.
पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव हवामान तज्ञ डॉ. माधवन नायर राजीव यांनी युरोपीय सेंटर फॉर मिडियन रेज वेदर फोरकास्ट मॉडेलला एक दावा केलाय. त्यांच्या म्हणन्यानुसार एल निनोमुळे आगामी थंडीचा ऋतू लहान असेल. थंडीचा जोर अजिबातही जस्ट वाटणार नाही. म्हणजेच येणाऱ्या ऋतूत थंडीचे दिवस फारच कमी असतील त तापमान सरासरीहून जास्त असेल. त्यामुळे थंडीच्या लाटेची शक्यताही फार नाही.
कडाक्याची थंडीही १ ते २ दिवस असेल
गेल्या १०-१२ वर्षांत कडाक्याची थंडी असलेल्या दिवसांची संख्या घटत आहे. चालू वर्षात एल निनोचा फटका थंडीलाही बसणार आहे. थंडीचा कडाका कमी राहू शकतो. एक दशकापूर्वी कडाक्याच्या थंडीचा मुक्काम ४-५ दिवसाचा असायचा. यंदा अशी थंडी केवळ १ ते २ दिवसांसाठी असेल.
एल निनोमुळे देशात थंडी लवकर सुरू होईल
एल निनोमुळे वातावरणातील तापमान जास्त होऊ शकते. तापमान वाढल्यानंतर पश्चिमेकडो विक्षोभाची पुनरावृती होते. ऑक्टोबरमध्ये त्याचा अनुभव आला होता. गेल्या २१ दिवसांत ५ पश्चिमी विक्षोभ आले आहेत. त्याचा परिणाम म्हणून यंदा थंडीचे आगमन गेल्या वर्षीच्या तुलनेत लवकर होऊ शकते. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात थंडीचा परिणाम दिसेल. उत्तरेकडील मैदानांत रात्रीचे तापमान आतापासून १५ अंशापर्यंत गेले आहे. आता दिवसाच्या तापमानातही घट होईल.