Havaman Andaj 2024 : गेल्या ऑगस्ट महिन्याची सुरुवात जशी दमदार पावसाने झाली होती तशीच सप्टेंबर महिन्याची सुरुवात दमदार पावसाने झाली. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रात पावसाने धुमाकूळ घातला. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अति जोरदार पाऊस झाला. काही भागांमध्ये अक्षरशः अतिवृष्टी समान पाऊस झाला.
एक आणि दोन सप्टेंबरला राज्यातील बहुतांशी भागांमध्ये पावसाचे प्रमाण अधिक होते. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण सर्वाधिक पाहायला मिळाले.
पण, काल राज्यातील काही भागांमधून पावसाने विश्रांती घेतली. दरम्यान, आता भारतीय हवामान खात्याने आज चार सप्टेंबर पासून ते 8 सप्टेंबर पर्यंत महाराष्ट्रातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस बरसणार याबाबत माहिती दिली आहे.
महाराष्ट्रातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस बरसणार?
4 सप्टेंबर : आज 4 सप्टेंबरला महाराष्ट्रातील खानदेशातील तिन्हीच्या तिन्ही म्हणजेच नंदुरबार, धुळे, जळगाव, मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये अर्थातच छत्रपती संभाजी नगर, धाराशिव, लातूर, जालना, नांदेड, परभणी, बीड, हिंगोली आणि विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम या 11 जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट दिला आहे.
5 सप्टेंबर : उद्या विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम या 11 जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता असून या पार्श्वभूमीवर या सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.
6 सप्टेंबर : सहा सप्टेंबरला दक्षिण कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मध्य महाराष्ट्रातील सातारा या जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.
7 सप्टेंबर : सात सप्टेंबरला मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर आणि दक्षिण कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
8 सप्टेंबर : ८ सप्टेंबरला मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा तसेच कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.