आज आणि उद्या महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता ! कोणत्या भागात पाऊस हजेरी लावणार ? हवामान खात्याने दिला नवीन अंदाज

Tejas B Shelar
Published:
Havaman Andaj

Havaman Andaj : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील जनता उष्णतेने होरपळत आहे. उन्हाचे चटके असह्य होत असल्याची परिस्थिती आहे. महाराष्ट्रासारखीच परिस्थिती राजस्थान, गुजरात अशा असंख्य राज्यांमध्ये पाहायला मिळत आहे. अशातच मात्र महाराष्ट्रातील जनतेसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे.

ती म्हणजे उन्हामुळे होणारी होरपळ आता थांबणार आहे. भारतीय हवामान खात्याने आज आणि उद्या महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाची शक्यता वर्तवली आहे. यामुळे उकाड्याने हैरान झालेल्या जनतेला काहीसा दिलासा मिळणार अशी आशा व्यक्त होत आहे.

आज आणि उद्या राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या विभागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेष म्हणजे विदर्भात देखील तुरळक ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस पाहायला मिळू शकतो असा अंदाज आहे.

या काळात राजधानी मुंबईतही हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज आणि उद्या राज्यात पावसाची शक्यता आहे शिवाय राज्यात लवकरच मान्सूनचे आगमन होणार असे देखील आयएमडीने म्हटले आहे.

महाराष्ट्रात कधीपर्यंत दाखल होणार मान्सून

हवामान खात्याने मान्सून 19 मे रोजी अंदमानत दाखल झाल्यानंतर 31 मे ला केरळमध्ये दाखल होणार असे म्हटले होते. मात्र या अंदाजापूर्वीच मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. 30 मेला मान्सूनचे केरळात आगमन झाले आहे.

त्यामुळे आता महाराष्ट्रात मान्सून कधी येणार? याकडे नागरिकांचे लक्ष आहे. यासंदर्भात भारतीय हवामान शास्त्र विभाग मुंबईचे संचालक सुनील कांबळे यांनी माहिती दिली आहे.

केरळमध्ये मान्सून आगमन झाल्यानंतर आठ ते दहा दिवसांनी मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार असे त्यांनी म्हटले आहे. म्हणजेच पुढील आठवड्यात मान्सून महाराष्ट्रात दाखल होऊ शकतो.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की दरवर्षी मानसून केरळमध्ये एक जुनच्या सुमारास दाखल होत असतो. मात्र यंदा मानसून त्याच्या नियोजित तारखेच्या दोन दिवस आधीच केरळात पोहोचला आहे.

यामुळे राज्यात देखील मानसून वेळेत किंवा वेळे आधीच पोहोचेल असा विश्वास तज्ञांनी व्यक्त केला आहे. राज्यातील किमान तापमान आज आणि उद्या 27 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील असा अंदाज आहे.

विशेष म्हणजे पुढील आठवड्यात तापमानात आणखी घट होणार आहे. किमान तापमान 26 अंश सेल्सिअस पर्यंत खाली येईल असे म्हटले जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Ahmednagar News