Havaman Andaj : महाराष्ट्रात पाऊस पुन्हा एकदा सक्रिय होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील पावसाचा जोर कमी झालाय. परंतु आता पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होणार अशी बातमी हवामान खात्याकडून समोर आली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा अजूनही कायमच आहे.
यामुळे राज्यात पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत आहे. खरे तर दरवर्षी मानसून काळात जेवढा पाऊस होतो तेवढा पाऊस यंदा मान्सूनच्या पहिल्या तीन महिन्यांमध्ये झाला आहे. आतापर्यंत राज्यात सरासरीपेक्षा जास्तीच्या पावसाची नोंद करण्यात आली आहे.
गेल्या महिन्यात अर्थातच ऑगस्टमध्ये राज्यात चांगला जोरदार पाऊस झाला आहे. सप्टेंबर मध्ये ही राज्यात चांगल्या पावसाची शक्यता आहे. 1 सप्टेंबर ते 3 सप्टेंबर आणि सात सप्टेंबर ते 10 सप्टेंबर दरम्यान राज्यात चांगला जोरदार पाऊस झाला होता. सात सप्टेंबरला अर्थातच गणरायाच्या आगमनाला पावसाचे आगमन झाले होते.
गणपती विसर्जनाच्या दिवशीही अर्थातच आज अनंत चतुर्दशीच्या दिवशीही महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्यातील तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे आज 17 सप्टेंबरला अर्थातच अनंत चतुर्दशीच्या दिवशी सिंधुदुर्ग-गोवा व पूर्व विदर्भात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता जाणवत आहे.
उर्वरित मुंबई, ठाण्यासह राज्यातील बहुतांश ठिकाणी कोरड्या ते अतिशय हलक्या सरींची शक्यता असल्याचे सुद्धा IMD कडून सांगितले गेले आहे. IMD च्या नवीन बुलेटिननुसार, आज गणेशविसर्जनापासून राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. तसेच, आगामी आठवड्यात काही भागात हलक्या ते मध्यम सरी पडण्याचा अंदाज आहे.
सिंधुदुर्ग- गोवा व पूर्व विदर्भात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता असून मुंबई ठाण्यासह राज्यातील बहुतांश ठिकाणी हलक्या सरींची शक्यता जाणवत आहे. मराठवाडा, विदर्भ खान्देशातील काही जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी , नांदेड, हिंगोली, खानदेशातील तिन्ही जिल्ह्यांमध्ये अर्थातच जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातही पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. एकंदरीत गणरायाच्या आगमनाच्या दिवशी म्हणजेच सात सप्टेंबरला राज्यात पाऊस सक्रिय झाला होता.
सात सप्टेंबरला पाऊस सक्रिय झाल्यानंतर 10 सप्टेंबर पर्यंत राज्यात भाग बदलत पाऊस पडला. आता अनंत चतुर्दशीच्या दिवशी म्हणजेच गणपती विसर्जनाच्या दिवशी देखील महाराष्ट्रात पाऊस सक्रिय होत आहे. तसेच आजपासून पुढील काही दिवस राज्यात पावसासाठी पोषक परिस्थिती राहणार असा अंदाज आहे.