Havaman Andaj : हवामान विभागाने पुढील दोन ते तीन दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात पावसाचा अंदाज वर्तवला आहे, तर कोकणात उष्णतेच्या लाटेचाही इशारा देण्यात आला. राज्यात उन्हाचा चटका वाढल्याने कमाल तापमानाचा पारा पुन्हा चाळिशीपार गेला आहे.
मराठवाड्यापासून तामिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. राज्याच्या विविध भागांत ढगाळ हवामान होत असून, पावसाला काही प्रमाणात अनुकूल हवामान कायम आहे. राज्यात सध्या काही भागांत ढगाळ हवामान आहे,
तर काही भागांत आकाश निरभ्र होऊ लागल्यामुळे कमाल तापमानात वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील काही शहरांचे तापमान ४० अंशांच्या पुढे गेले आहे. त्यामुळे ढगाळ हवामानावरोबर उकाड्याचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.
हवामान विभागाने २८ ते २९ एप्रिलदरम्यान कोकणातील काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला, तर याच दरम्यान मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात काही भागांत पावसाची शक्यता आहे. दरम्यान, राज्यात शनिवारी कमाल तापमान वाशिम येथे उच्चांकी ४३ अंश सेल्सिअस इतके नोंदवले आहे, तर किमान तापमान महाबळेश्वर येथे २०.६ अंश सेल्सिअस होते.
प्रमुख जिल्ह्यांतील कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
पुणे ३९.९, अहमदनगर ३९.८, जळगाव ४१.५, कोल्हापूर ३८.७, महाबळेश्वर ३२.९, मालेगाव ४२, नाशिक ४०.१, सांगली ४०.५. सातारा ३९.१, सोलापूर ४२, मुंबई ३३, रत्नागिरी ३४.७, डहाणू ३४.६ धाराशीव ४१.८,
छत्रपती संभाजीनगर ३९.२, परभणी ४१.५, नांदेड ४२.४, बीड ४१.२, अकोला ४१.४, अमरावती ४०, बुलडाणा ३९, ब्रह्मपुरी ४२.७, चंद्रपूर ४२.८, गोंदिया ३७.६, नागपूर ३९.७, वर्षा ४१.४, यवतमाळ ४१.७.