हवामान

बारागाव नांदूर परिसरामध्ये अर्धा तास जोरदार पाऊस

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर परिसरामध्ये काल शनिवारी (दि.२०) सायंकाळी अर्धा तास जोरदार पाऊस झाला. तसेच राहुरी शहरात देखील वादळी वाऱ्यासह काल सायंकाळी जोरदार पावसाने हजेरी लावली होती.

यावेळी राहुरी तालुक्यातील विविध ठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. राहुरी तालुक्यातील वळण परिसरामध्ये रात्री आठ वाजता वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाटासह अर्धा तास पाऊस झाला. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झालेला होता.

अनेक शिवारात शेतात काढणीला आलेला कांद्याला पावसाचा फटका बसून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. दरम्यान, नेवासा तालुक्यातील कुकाण्यात देखील हलक्या स्वरूपात अवकाळी पाऊस पडला. तर नेवासा शहरात हलक्या स्वरूपात अवकाळी पाऊस झाला.

Ahmednagarlive24 Office