Maharashtra Rain :- सध्या राज्यांमध्ये भागात अवकाळी पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळत असून वादळी वारे तसेच गारपिटीने धुमाकूळ घातल्याचे चित्र असून काही भागात मात्र प्रचंड प्रमाणात उष्णता देखील आहे.
राज्यातील बऱ्याच भागांमध्ये पारा 40° च्या पुढे असून उकाड्याने नागरिक हैराण झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे अनेक फळ पिके आणि कांद्यासारख्या काढणीला आलेल्या पिकांचे अतोनात नुकसान होत आहे.
दरम्यान किती दिवस अजून अवकाळीचा तडाका महाराष्ट्राला बसणार? हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे. याबाबत प्रसिद्ध हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
अवकाळी बद्दल हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
राज्यातील पावसाबद्दल माहिती देताना माणिकराव खुळे यांनी म्हटले की राज्यातील विविध भागांमध्ये पुढील आठवडाभर म्हणजेच 18 मे पर्यंत पाऊस पडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच महाराष्ट्रातील जवळपास 29 जिल्ह्यात आजपासून पुढील आठ महिन्यापर्यंत ढगाळ वातावरण व काही ठिकाणी भाग बदलत अवकाळी पावसाची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
तसेच या पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.
कोणत्या भागात कोणत्या दिवशी गारपिटीची आहे शक्यता?
याबाबत हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार बघितले तर आजपासून ते मंगळवार दिनांक 14 मे असे चार दिवस संपूर्ण विदर्भ, मराठवाडा, खानदेश तसेच नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली,
कोल्हापूर आणि सोलापूरचे 29 जिल्ह्यात मध्यम अवकाळी( विजांचा गडगडाटासह वारा व गारा) पावसाची शक्यता जाणवत आहे तसेच रविवार दि. 12 मे ते मंगळवार दिनांक 14 मे पर्यंतच्या तीन दिवसात कोल्हापूर, सांगली, धाराशिव, सोलापूर, लातूर, नांदेड, गडचिरोली आणि यवतमाळ या जिल्ह्यात मध्यम अवकाळी पाऊस व गारपीटीची शक्यता जास्त असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मुंबई आणि कोकणातही अवकाळीची शक्यता
काल शनिवार दिनांक 11 मे ते गुरुवार दिनांक 16 मे या सहा दिवसांमध्ये मुंबई तसेच मुंबई उपनगरासह संपूर्ण कोकणातील ठाणे, पालघर,रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी सात जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहून या ठिकाणी किरकोळ स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.