Havaman Andaj : थंडीच्या ऋतूस सुरवात झाल्यानंतर सुरवातीचे अनेक दिवस थंडी गायब होती. मध्ये पाऊसही येऊन गेला. परंतु आता थंडी मात्र चांगलीच वाढली आहे. वातावरणातील गारवा वाढल्याने तापमान घटले आहे.
अहमदनगर, नाशिक, पुण्यात सर्वात कमी तापमान आढळून आले आहे. पुढील काही दिवस थंडीचा कडाका कायम राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. नगरचा पारा ११ ते १२ अंशावर आला असून आणखी दोन दिवसात तो १० ते ९ अंशापर्यंत खाली येण्याची शक्यता वर्वतली आहे.
नगरचा पारा १० ते ११ अंशावर
नगरमधील वातावरण चांगलेच थंड झाले आहे. मंगळवारी मध्यरात्रीनंतर नगरचा पारा १० ते ११ अंशावर आलेला होता. बुधवारी व गुरुवारीही सकाळपासून गार वारा सुरू आहे. बुधवारी नाशिक, पुणे,
जळगावसह नगरचे तापमानही सर्वात थंड होते. गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका वाढल्याने रब्बी पिकांना चांगलाच फायदा होत आहे.
जानेवारी महिन्यात पडलेल्या थंडीमुळे गहू, हरभऱ्याच्या उत्पादनात वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, जानेवारी अखेरपर्यंत थंडीचा कडाका कायम राहील असे म्हटले जात आहे.
बुधवारी नाशिक (९ अंश), अहमदनगर (९.३ अंश), पुणे (९.७ अंश), जळगाव (९.९ अंश), छत्रपती संभाजीनगर (१०.२ अंश) असे तापमान नोंदले गेले
थंडी कमी कधी होईल ?
फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यानंतर दिवसाच्या तापमानात हळूहळू वाढ होईल. १५ फेब्रुवारी नंतर रात्रीचा पारा १४ अंशांपर्यंत राहण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
नगरचे प्रदूषण वाढले, घशाचे आजार वाढतील?
हिमालयाच्या पायथ्यापासून पठार भागाकडे थंड वारे वाहत असल्याने थंडी चांगलीच वाढली आहे.आणखी तीन-चार दिवस अशी थंडी कायम राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे दोन-तीन दिवस ढगाळ हवामान राहील,
मात्र हे ढग पावसाचे नसतील असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. दरम्यान नगरचा एअर पोल्युशन टॉलरन्स इंडेक्स वाढला आहे. तो अगदी दोनशेवर पोहोचला असल्याने घशाचे आजारही वाढतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.