येत्या दोन दिवसात राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा !

Pragati
Published:
जोरदार पावस

राज्याच्या अनेक भागांत पाऊस हजेरी लावत आहे. तसेच कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही भागांत जोरदार पाऊस झाला आहे. पुढील चार दिवस राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

समुद्रसपाटीवरील कमी दाबाचा पट्टा दक्षिण गुजरात ते केरळ किनारपट्टीपर्यंत सक्रिय आहे. त्यामुळे राज्याच्या काही भागांत दमदार पाऊस पडत आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत कोकण भागातील मुंबईत ३५ मिमी पाऊस पडला. सांताक्रुझ १९, अलिबाग ३, रत्नागिरी १४, तर डहाणू येथे ७१ मिमी इतका जोरदार पाऊस पडला.

मध्य महाराष्ट्रातील पुणे येथे ७.१ मिमी, जळगाव ४, कोल्हापूर ५, महाबळेश्वर ३७, नाशिक ९, सांगली ४, सातारा ८, तर सोलापूर ०.८ मिमी पावसाची नोंद झाली. मराठवाड्यातील धाराशीव १, छत्रपती संभाजीनगर ०.८, विदर्भातील अमरावती १, बुलढाणा १, गोंदिया ४, तर यवतमाळ येथे ४ मिमी पाऊस पडला.

येत्या २३ ते २६ जुलैदरम्यान, मुंबई, सिंधुदुर्ग, रायगड, कोल्हापूर, रत्नागिरी, सातारा, पुणे, नाशिक, धुळे, नंदूरबार, ठाणे, पालघर, जळगाव या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते अतिजोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

महाडमध्ये पावसामुळे दोघांचा मृत्यू

महाड तालुक्यात रविवार २१ जुलै रोजी कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या दोन घटनांमध्ये वृद्धासह एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. बाळाजी नारायण उतेकर (६५) आणि अंकित म्हामुणकर अशी या दोघांची नावे आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe