हवामान

पंजाबराव डख यांचा तातडीचा मॅसेज ! पुन्हा एकदा महाराष्ट्रात बरसेल पाऊस…

Published by
Ajay Patil

Panjabrao Dakh:- सध्या महाराष्ट्रातील बऱ्याच भागांमध्ये पावसाने चांगल्या प्रकारे हजेरी लावली असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाल्याची परिस्थिती आपण सगळ्यांनी बघितली.

तसेच महाराष्ट्राच्या बऱ्याच भागांमध्ये सध्या रिमझिम स्वरूपाचा पाऊस सुरू असल्याची देखील स्थिती आहे. त्यामुळे पिकांच्या दृष्टिकोनातून कधी दर्शन होईल या प्रतीक्षेत  शेतकरी असल्याची स्थिती आहे.

परंतु आज म्हणजे 11 ऑगस्ट पासून ते साधारणपणे 24 ऑगस्टपर्यंत महाराष्ट्रातील हवामान कसे राहील? याबाबतचा महत्त्वाचा अंदाज ज्येष्ठ हवामान अभ्यासाक पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे. त्यामुळे हा त्यांचा अंदाज शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे.

 काय आहे पंजाबरावांचा ऑगस्ट महिन्यातील हवामान अंदाज?

पंजाबरावांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात आज म्हणजे 11 ऑगस्ट पासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाचा जोर ओसरणार असून सूर्यदर्शन पाहायला मिळणार आहे. ही सूर्य दर्शनाची स्थिती साधारणपणे 11 ऑगस्ट पासून ते 16 ऑगस्ट पर्यंत राहणार असल्याची त्यांनी म्हटले आहे.

म्हणजेच राज्याच्या बऱ्याच भागांमध्ये 11 ते 16 ऑगस्ट दरम्यान पावसाचे उघडीप पाहायला मिळणार आहे. विभागनिहाय बघितले तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर, जालना तसेच नांदेड,हिंगोली, परभणी तसेच बीड, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यामध्ये सूर्यदर्शन होण्याची शक्यता आहे.

तसेच उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगर मध्ये देखील पावसाची उघडीप पाहायला मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 16 ऑगस्ट नंतर म्हणजे 17 ऑगस्ट पासून मात्र महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा बदल होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. याबाबत माहिती देताना पंजाबराव यांनी म्हटले की,

राज्यामध्ये पुन्हा एकदा 19 ऑगस्ट पासून ते 24 ऑगस्टपर्यंतच्या कालावधीत पुन्हा पावसाला सुरुवात होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी म्हटले.तसेच 19 ऑगस्ट ते 24 ऑगस्ट दरम्यान राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस हजेरी लावणार याबद्दलचा महत्वाचा सविस्तर अंदाज देखील येणाऱ्या काही दिवसात पंजाबराव डख जारी करतील

व शेतकऱ्यांसाठी ते महत्त्वाचे असणार आहे. त्यामुळे 19 ऑगस्ट पासून राज्यातील कोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडेल हे आपल्याला येत्या काही दिवसात  समजेल.

Ajay Patil

Published by
Ajay Patil