Maharashtra Havaman:- सध्या राज्यामध्ये सगळीकडे थंडीचे प्रमाण वाढले असून बऱ्याच ठिकाणी पारा 10 अंशाच्या खाली आलेला आहे. उत्तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर थंडीची लाट पसरल्यामुळे त्याचा परिणाम हा राज्यातील अनेक जिल्ह्यात दिसून येत आहे.
त्यामुळे महाराष्ट्रातील मराठवाडा व विदर्भ व त्यासोबतच उत्तर महाराष्ट्रात देखील थंडीची लाट आहे. याबाबतीत जर आपण हवामान खात्याचा अंदाज पाहिला तर डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत म्हणजेच हा महिना संपेपर्यंत या पद्धतीची थंडी जाणवेल असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे.
परंतु या पार्श्वभूमीवर जर हवामान खात्याचा अंदाज पाहिला तर तो शेतकऱ्यांच्या मनात धडकी भरवणारा आहे हे मात्र निश्चित. कारण हवामान खात्याचा अंदाजानुसार या नवीन वर्षाची सुरुवात म्हणजे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील काही भागात पाऊस हजेरी लावेल अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. नेमके हवामान खात्याने याबाबत काय सांगितले आहे? याबाबतची माहिती या लेखात घेणार आहोत.
राज्याच्या या भागात पावसाचा इशारा
सगळीकडे थंडी आणि धुक्याची चादर पसरलेली असताना हवामान खात्याच्या माध्यमातून मात्र जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये राज्यातील काही भागात पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवली आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे देशासह राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडेल अशी शक्यता असून महाराष्ट्र,
राजस्थान आणि पंजाब मध्ये हा पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आलेला आहे. त्यामध्ये जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर मध्य महाराष्ट्रातील खानदेश पट्ट्यात असलेले शिरपूर, शहादा, यावल, रावेर आणि चोपडा या तालुक्यांमध्ये किरकोळ पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून 31 डिसेंबर ते एक जानेवारी रोजी हा पाऊस पडेल असा इशारा देण्यात आला आहे.
या ठिकाणी राहील काही दिवस ढगाळ हवामान
29 डिसेंबरला उत्तर भारतातून येणारे जे काही पश्चिम वारी आहेत ते जमिनीपासून उच्च पातळीवर थंडी आणि दक्षिण भारतातून महाराष्ट्रापर्यंत निम्न म्हणजेच खालच्या पातळीतून पोहोचणाऱ्या पूर्वझोती वाऱ्यांच्या समन्वयातून मध्य महाराष्ट्रातील खानदेश तसेच नाशिक,
नगर ते सोलापूर पर्यंतच्या दहा जिल्ह्यांमध्ये तसेच धाराशिव व लातूर या बारा जिल्ह्यांमध्ये 31 डिसेंबर ते दोन जानेवारी या तीन दिवस ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे या भागांमध्ये थंडीचे प्रमाण कमी होऊन वातावरणामध्ये उबदारपणा राहील अशी देखील शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.