30 एप्रिलपासून कस राहणार महाराष्ट्रातील हवामान ? पावसाची स्थिती काय राहणार ? जाणून घ्या सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Rain Alert : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात विषम हवामान पाहायला मिळत आहे. राज्यातील काही भागात वादळी पाऊस सुरू आहे तर काही ठिकाणी उन्हाचा चटका वाढला आहे. वाढत्या उष्णतेमुळे नागरिक बेजार झाले आहेत. राज्यातील अनेक भागांमधील तापमान 42 ते 43 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहे.

उन्हाची दाहकता एवढी अधिक आहे की, उष्माघाताची देखील शक्यता नाकारून चालत नाहीये. यामुळे या प्रचंड उकाड्यापासून आणि वाढत्या तापमानापासून सर्वसामान्यांनी आपले संरक्षण करावे असा सल्ला तज्ञ लोकांच्या माध्यमातून दिला जातोय.

परंतु राज्यातील मराठवाडा आणि विदर्भ विभागातील काही भागांमध्ये वादळी पावसाचे सत्र अजूनही सुरूच आहे. भारतीय हवामान खात्याने आज देखील विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता असल्याचा अंदाज जारी केला आहे.

विशेष म्हणजे आयएमडीने पुढील दोन दिवस राज्यातील काही भागांमध्ये पाऊस हजेरी लावणार असे म्हटले आहे. तसेच काही भागांमध्ये उष्णतेची लाट येणार असा अंदाज आहे. म्हणजेच अजूनही राज्यात समिश्र वातावरण पाहायला मिळत आहे.

दरम्यान सध्या सुरू असलेल्या वादळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी बांधवांच्या माध्यमातून अवकाळी पाऊस कधी थांबणार? हा प्रश्न विचारला जात आहे.

दरम्यान याच संदर्भात हवामान खात्याने मोठी माहिती दिली आहे. हवामान विभागाने आज अर्थातच 29 तारखेला राज्यातील कोकण विभागातील सर्वच्या सर्व सहा जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येणार असा इशारा दिला आहे.

उद्या मात्र मुंबई, ठाणे आणि रायगड या भागात उष्णतेची लाट येईल असे आयएमडीने म्हटले आहे. पण, मराठवड्यातील बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.

याशिवाय विदर्भ विभागात देखील पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. येथील अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदीया, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

तथापि उद्यापासून पावसाचा जोर काहीसा कमी होणार असे आयएमडीने म्हटले आहे. उद्या एप्रिल महिन्याचा शेवटचा दिवस. दरम्यान उद्यापासून पावसाचा जोर कमी होणार अशी शक्यता आता व्यक्त होत आहे. यामुळे नवीन महिन्याच्या सुरुवातीला राज्यातील हवामान कोरडे राहणार असे बोलले जात आहे.

तथापि, एप्रिल महिन्यात अनेक ठिकाणी वादळी पावसाने हजेरी लावली असल्याने ऐन काढणीच्या अवस्थेत असलेल्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याचा शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे, यामुळे उत्पादनात मोठी घट येणार अशी भीती आता व्यक्त होत आहे.