हवामान

Maharashtra Rain:ऐन रब्बी हंगामात महाराष्ट्रात पावसाचा इशारा! वाचा केव्हा पडेल कोणत्या जिल्ह्यात पाऊस?

Published by
Ajay Patil

Maharashtra Rain:- सध्या हिवाळ्याचा कालावधी सुरू असून राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कडाक्याच्या थंडीचा अनुभव नागरिकांना येत असतानाच मात्र गेल्या एक ते दोन दिवसापासून राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण असून बऱ्याच ठिकाणी पावसाने हलक्या सरीच्या रूपाने हजेरी लावल्याचे चित्र आहे.

रब्बी हंगामाच्या तोंडावरच पावसाने अशाप्रकारे हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत नक्कीच वाढ होईल हे मात्र निश्चित. गेल्या दोन ते तीन दिवसापासून राज्यात ढगाळ हवामान तर आहेच

परंतु पावसाच्या हलक्या सरी देखील पडले असून याच पार्श्वभूमीवर हवामान विभागाच्या माध्यमातून राज्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे. याच अनुषंगाने आपण राज्यातील जिल्ह्यांतील पावसाबद्दलचा अंदाज काय आहे? हे थोडक्यात पाहू.

 राज्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा इशारा

हवामान विभागाने अकोला, अमरावती तसेच बुलढाणा व नागपूर जिल्ह्याला विजा व ढगांच्या गडगडाटासह हलका पावसाचा अंदाज दिला असून कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी तसेच मध्य महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नासिक, अहमदनगर, पुणे व पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर,

सातारा आणि सांगली तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर या जिल्ह्यांमध्ये विजासह हलका पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच रविवारी कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नासिक, अहमदनगर, पुणे व कोल्हापूर तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर तर विदर्भातील अकोला व अमरावती जिल्ह्यांना काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.

 सोमवारी या ठिकाणी पावसाचा अंदाज

तसेच सोमवारचा विचार केला तर मध्य महाराष्ट्रातील धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी विजा व ढगांच्या कडकडाटासह हलक्या पावसाचा अंदाज देण्यात आला असून कोकण तसेच नासिक, पुणे, कोल्हापूर, सातारा, छत्रपती संभाजी नगर, अकोला, अमरावती आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी तुरळक पाऊस होईल अशी शक्यता आहे.

 मंगळवारी या जिल्ह्यांमध्ये आहे पावसाचा अंदाज

यासोबतच मंगळवारी नाशिक, अहमदनगर तसेच छत्रपती संभाजी नगर आणि जळगाव जिल्ह्यात काही ठिकाणी विजा व ढगांचा कडकडाटासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil