हवामान

Maharashtra Rain: राज्यातील बऱ्याच भागांमध्ये उकाडा वाढण्याची शक्यता; परंतु सोमवारपासून राज्यातील ‘या’ ठिकाणी आहे पावसाचा अंदाज

Published by
Ajay Patil

Maharashtra Rain:- सध्या देशात आणि संपूर्ण राज्यांमध्ये उन्हाची तीव्रता प्रचंड प्रमाणात वाढली असून देशातील अनेक भागांमध्ये उष्णतेची लाट असल्याची सध्या स्थिती आहे. प्रचंड उकाड्याने नागरिक हैराण झाल्याची स्थिती आहे.जर आपण भारतातील सर्वाधिक तापमानाची नोंद पाहिली तर ती आंध्र प्रदेश राज्यातील नांद्याल येथे नोंदविण्यात आली व या ठिकाणी सर्वाधिक 46.3 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले.

तसेच येणाऱ्या पाच दिवसांमध्ये देशातील काही भागांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देखील हवामान विभागाच्या माध्यमातून देण्यात आला आहे. देशातील बऱ्याच राज्यांमध्ये प्रचंड प्रमाणात उष्णता असून हवामान विभागाच्या माध्यमातून पश्चिम बंगाल, तामिळनाडू तसेच आंध्र प्रदेश राज्याचा किनारी भाग,

ओडिशा, छत्तीसगड, कर्नाटक, राजस्थान, पश्चिम मध्य प्रदेशातील काही भाग आणि तेलंगणा इत्यादी राज्यांमध्ये आज आणि उद्या उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला असून कोकण, गोवा आणि गुजरात या राज्यांमध्ये देखील उष्ण तापमान राहील व उकाडा जाणवेल असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

 कसे राहील महाराष्ट्रातील तापमान?

महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून बघितले तर महाराष्ट्रामध्ये देखील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पारा चाळीस अंशाच्या पुढे असून हवामान विभागाच्या माध्यमातून आज आणि उद्या कोकणातील ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यातील काही ठिकाणी उष्ण हवामान राहिल व उकाडा जाणवेल असा अंदाज दिला असून मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी सोमवारपासून पावसाचा अंदाज देखील वर्तवला आहे.

 या जिल्ह्यांमध्ये आहे विजा आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज

देशात आणि राज्यातील बऱ्याच भागांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा असताना महाराष्ट्रात मात्र सोमवार आणि मंगळवार या दोन दिवसांमध्ये राज्यातील काही जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

यामध्ये मराठवाड्यातील लातूर, धाराशिव, नांदेड जिल्ह्यातील काही ठिकाणी तर विदर्भातील गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.

 बुधवारी राज्याच्या या जिल्ह्यांमध्ये आहे वादळी पावसाचा अंदाज

तसेच सोमवार आणि मंगळवार व्यतिरिक्त बुधवारी देखील राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे व यामध्ये विदर्भातील गडचिरोली, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर आणि त्यासोबतच सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील काही भागांमध्ये वादळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil