शेतकऱ्यांसाठी गोड बातमी ! मान्सूनची वेगवान आगेकूच, आज ‘या’ भागात पोहोचला Mansoon ; राज्यात कधीपर्यंत एन्ट्री होणार ?

Tejas B Shelar
Published:
Mansoon 2024 Update

Mansoon 2024 Update : गेल्या अनेक दिवसांपासून मान्सूनच्या मोठ्या चर्चा पाहायला मिळत आहेत. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार यावर्षी मानसून 19 मे ला अंदमानत दाखल झाला आहे. दरवर्षी मान्सूनचे अंदमानत 22 मे च्या आसपास आगमन होत असते. यंदा मात्र दोन-तीन दिवस लवकरच मान्सूनचे अंदमानात आगमन झाले आहे. एवढेच नाही तर मान्सूनची आगेकूच जलद गतीने सुरू आहे.

मान्सून पुढे सरकण्यासाठी पोषक परिस्थिती तयार झाली असल्याने आज अर्थातच 22 मे 2024 ला मान्सूनने दक्षिण अरबी समुद्राचा काही भाग, मालदीवचा आणखी काही भाग, कोमोरिन क्षेत्र, दक्षिण बंगालचा उपसागर, अंदमान आणि निकोबार बेटे आणि अंदमान समुद्राचा भाग व्यापला आहे.

तसेच भारतीय हवामान खात्याने जर आगामी काळातही मान्सूनसाठी अशीच अनुकूल परिस्थिती कायम राहिली तर यावर्षी 31 मे च्या सुमारास केरळमध्ये मान्सूनचे आगमन होईलच असे म्हटले आहे.

आय एम डी ने केरळमध्ये 28 मे ते ३ जून या कालावधीत यंदा मान्सून आगमन होणार असे स्पष्ट केले आहे. एकंदरीत येत्या काही दिवसात मान्सूनचे भारताच्या मुख्य भूमीत आगमन होणार आहे. केरळमध्ये पोहोचल्यानंतर मानसून गोव्यात दाखल होणार आहे.

दरवर्षी मान्सूनचे गोव्यात पाच जूनच्या सुमारास आगमन होत असते. महाराष्ट्र बाबत बोलायचं झालं तर राज्यात दरवर्षी सात जूनच्या सुमारास मान्सूनची एन्ट्री होत असते. मानसून सर्वप्रथम राज्यातील तळ कोकणात दाखल होतो.

तळ कोकणात सात जूनच्या सुमारास पोहोचतो यानंतर ११ जून च्या सुमारास मानसून मुंबईमध्ये सलामी देतो. यानंतर मग 15 जून पर्यंत संपूर्ण महाराष्ट्र व्यापत असतो. यावर्षी देखील याच नियोजित वेळेत मान्सूनचे महाराष्ट्रात आगमन होईल अशी शक्यता आहे.

तथापि, राज्यात मान्सूनचे आगमन कधी होणार हे जाणून घेण्यासाठी आणखी काही दिवस वाट पहावी लागणार आहे. हवामान खात्यातील तज्ञ लोक येत्या काही दिवसात महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन कधी होणार या संदर्भात सविस्तर माहिती जारी करणार आहेत.

एकंदरीत सध्या मान्सूनच्या पुढील प्रवासासाठी पोषक परिस्थिती तयार झाली असल्याचे पाहायला मिळत आहे. दुसरीकडे भारताच्या दक्षिण भागात या आठवड्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

केरळला तर चक्क रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. दक्षिण भारतात 25 मे पर्यंत मुसळधार पाऊस बरसणार असा अंदाज आहे. तसेच ईशान्येकडील राज्यांमध्ये 26 मे पर्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe