Winter 2023 : वातावरण यावर्षी विषम झाल्याचे पाहायला मिळाले. आधी आलेल्या एलनिनो वादळाने विषम वातावरण तयार झाले होते. याचा अपरिणाम पावसावर झाला. आता दक्षिण-पूर्व बंगालचा उपसागर आणि दक्षिण अंदमान समुद्रावर सध्या कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले असल्याने ‘मिचाँग’ चक्रीवादळ धडकले आहे.
याचा परिणाम आगामी काळातील वातावरणावर होणार आहे. या वादळामुळे थंडी कमी होणार असून मराठवाडा, विदर्भासह तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा व प. बंगालच्या किनारपट्टीवर पावसाची शक्यता आहे.
उन्हाळा सुसह्य असेल !
हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, वातावरणातील आर्द्रता वाढली आहे. त्याचप्रमाणे चक्रीवादळाची दिशा पूर्वेकडे दिसते. त्यामुळे उत्तरेकडून येणाऱ्या थंडीत यंदा घट होणार आहे. त्यामुळे बोचरी थंडी पडणार नाही.
वाढलेल्या तापमानामुळे व इतर काही कारणाने आगामी तीन महिने तरी अवकाळी पाऊस, गारपीटही होणार नाही. एप्रिलनंतर ‘सुपर एल निनो’चा प्रभाव कमी होईल आणि मग त्यामुळे उन्हाळा सुसह्य होईल असे म्हटले आहे.
एल- निनो, ला-निनो म्हणजे काय असते ते जाणून घ्या.
एल- निनो, ला-निनो हे तापमानाशी संबंधित आहे. प्रशांत महासागराचे सरासरी तापमान जर ०.५ डिग्री सेल्सियस वाढले तर त्याला एल-निनो असे म्हणतात. तर (-०.५) डिग्री घसरलेल्या तापमानाला ला- निनो म्हणतात.
मार्च-एप्रिलपासूनच एल-निनोचा प्रभाव जाणवायला लागला. ऑक्टोबरपर्यंत समुद्राच्या सरासरी तापमानात १.५ डिग्री वाढ झाली. सप्टेंबरपासून एल-निनो ‘सुपर एल-निनो’ स्तरावर गेले होते.
यंदा कमी पाऊस का पडला ?
प्रशांत महासागरात एल-निनो म्हणजेच प्रशांत महासागराचे सरासरी तापमान ०.५ डिग्री सेल्सियस वाढले. यामुळे विषुववृत्तावरील तापमानात वाढ झाली. तापमान वाढले की हवेचा दाब घटतो.
प्रशांत महासागराचे तपमान वाढल्याने तेथील हवेचा दाब कमी झाला. जेथे हवेचा दाब कमी तेथे वारा वाहतो. हिंद महासागराचे तापमान कमी असल्याने, जास्त हवेचा दाब असणाऱ्या वाऱ्यांनी येथील बाष्प तेथे वाहून नेले.
यामुळे यंदा मान्सूनचे आगमन लांबले व याचा परिणाम पुढेही होत गेला. त्यामुळे मान्सून जाईपर्यंत बहुतांश ठिकाणी पावसवाचे प्रमाण कमी होते.