Monsoon 2024 बाबत मोठी अपडेट ! मुंबई आणि पुण्यात कधी दाखल होणार मान्सून ? हवामान खात्याने स्पष्टचं सांगितलं

Monsoon 2024

Monsoon 2024 : गेल्या काही दिवसांपासून अफगाणिस्तान आणि पाकिस्तानातून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये आणि आपल्या महाराष्ट्रात कमाल तापमानात मोठी वाढ झाली आहे. सध्या देशाच्या अनेक भागात या कडाक्याच्या उन्हाने थैमान माजवले आहे. उन्हाच्या चटक्याने नागरिक बेजार झाले आहेत.

आता उष्णतेपासून थोडासा दिलासा मिळावा, यासाठी सर्वजण आतुरतेने मान्सूनची अन मोसमी पावसाची वाट पाहत आहेत. पावसाळा कधी सुरू होणार हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे.

शेतकरी राजा अगदी चातकाप्रमाणे मान्सूनची वाट पाहत आहे. दरम्यान भारतीय हवामान खात्याने या महिन्याच्या अखेरीस अर्थातच 31 मे च्या सुमारास मान्सून केरळमध्ये दाखल होऊ शकतो आणि त्यानंतर तो इतर राज्यांकडे सरकू शकतो असा अंदाज नुकताच जारी केला आहे.

दरम्यान, आता हवामान खात्याने महाराष्ट्रातील जनतेला आनंदाची बातमी दिली आहे. महाराष्ट्रातील मान्सून आगमना संदर्भात हवामान खात्याच्या माध्यमातून महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मान्सून 9-10 जूनच्या सुमारास महाराष्ट्रातील पुणे शहरात दाखल होऊ शकतो. तसेच, मान्सून 11 जून रोजी मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे.

पहिल्या आठवड्याच्या शेवटी आणि दुसऱ्या आठवड्याच्या सुरूवातीस केरळमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. यामुळे केरळमध्ये 31 मे च्या सुमारास मान्सून आगमन होऊ शकते.

पण या जाहीर केलेल्या तारखेत तीन-चार दिवस मागे-पुढे होऊ शकते. म्हणजेच 28 मे ते 3 जून या कालावधीत मान्सून केरळात येणार असा अंदाज आहे. मुंबईत मान्सूनच्या प्रवेशाबाबत अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही.

तथापि, केरळमध्ये जवळजवळ सामान्य मान्सूनची सुरुवात आणि अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागरावर अपेक्षित चक्रीवादळ नसल्यामुळे मुंबईत वेळेत मान्सून दाखल होईल असा अंदाज आहे.

खरे तर दरवर्षी मानसून 11 जूनच्या सुमारास राजधानी मुंबई पोहोचत असतो. मात्र गेल्यावर्षी मान्सून तब्बल दोन आठवडा उशिराने मुंबई दाखल झाला होता.

यंदा मात्र मानसून साठी खूपच अनुकूल परिस्थिती असून यामुळे नऊ ते दहा जूनच्या सुमारास पुण्यात आणि 11 जून च्या सुमारास मुंबईत मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.