कधी जाणार हा तापदायक उन्हाळा ! मुंबईत मान्सूनचं आगमन कधीपर्यंत होणार ? हवामान तज्ञांनी स्पष्टचं सांगितलं

Tejas B Shelar
Published:
Monsoon In Mumbai

Monsoon In Mumbai : सध्या मुंबईसहित संपूर्ण राज्यभर होत असलेली तापमान वाढ डोकेदुखी वाढवत आहे. वाढत्या उकाड्यामुळे जनता हैरान झाली आहे. उन्हाच्या वाढत्या चटकांमुळे घामटा निघत आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातून येणारे उष्ण वारे अधिक तापदायक असून यामुळे राज्यातील जनतेच्या माध्यमातून आता मान्सूनचे आगमन कधी होणार हाचं प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मुंबईकर देखील मानसून मुंबईत कधी पोहोचणार? अशी विचारणा करत आहेत. खरे तर मुंबई सहित मुंबई उपनगरांमध्ये येत्या काही दिवसात तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र आता हे उन्हाळ्याचे शेवटचे दिवस आहेत.

कारण की आता लवकरच मान्सून मुंबईत सलामी देणार आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने महाराष्ट्राच्या मुख्य भूमित आणि मुंबईत मान्सून कधीपर्यंत पोहोचणार याची संभाव्य तारीख जाहीर केली आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की भारतीय हवामान विभाग मुंबईचे अध्यक्ष सुनील कांबळे यांनी मान्सूनच्या आगमनाची संभाव्य तारीख डिक्लेअर केली आहे. कांबळे यांनी एका प्रतिष्ठित वृत्तसंस्थेला मान्सून संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे.

त्यांनी सांगितल्याप्रमाणे, सध्या दक्षिण पश्चिम मान्सून अंदमानात दाखल झाला आहे. तसेच, हा Monsoon येत्या काही दिवसात केरळात येणार आहे. 31 मे ला मोसमी वारे केरळात दाखल होतील असा अंदाज असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

तसेच केरळात मान्सूनचे आगमन झाल्यानंतर पुढं तो जून महिन्याच्या 10 किंवा 11 तारखेला मुंबईत दाखल होऊ शकतो असे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे. म्हणजेच मुंबईत मान्सून आगमनाची संभाव्य तारीख 10 किंवा 11 जून राहणार आहे.

पण, मुंबईत मान्सूनच्या आगमनास 3- 4 दिवसांचा विलंबही होऊ शकतो अशीही शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. खरंतर भारतीय हवामान विभागाने केरळमध्ये मान्सूनचे 31 जूनला आगमन होणार असे म्हटले आहे.

मात्र या जाहीर केलेल्या तारखेत तीन-चार दिवस मागे पुढे होऊ शकते म्हणजेच केरळमध्ये मान्सून 28 मे ते तीन जून या कालावधीत दाखल होणार असे आयएमडीने आधीच स्पष्ट केले आहे.

खरेतर दरवर्षी राजधानी मुंबईत मान्सूनचे 11 जूनच्या सुमारास आगमन होते. मात्र गेल्या वर्षी मुंबईत मानसून तब्बल दोन आठवडा उशिराने दाखल झाला होता. यामुळे यंदा मान्सून त्याच्या नियोजित वेळेत पोहोचणार का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.