हवामान

Monsoon News:येत्या 4 ते 5 दिवसात महाराष्ट्राच्या कोणत्या भागात पडेल मुसळधार पाऊस? वाचा काय म्हणतात हवामान तज्ञ?

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

 बऱ्याचअंशी अगदी धिम्या गतीने प्रवास करत असलेला मान्सून आता त्यातील बऱ्याच जिल्ह्यांना व्यापताना दिसून येत असून राज्यातील विदर्भ तसेच कोकण व मध्य महाराष्ट्रात देखील पावसाचे आगमन झालेले आहे. संपूर्ण जून महिना गेला तरी देखील पुरेसा पाऊस न पडल्यामुळे खरीप हंगामातील पेरण्या रखडलेले आहे.

तसे पाहायला गेले तर अजून देखील पेरणीयोग्य पाऊस राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये झालेला नाही. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी अजून देखील पेरण्या सुरू झालेल्या नसून  काही ठिकाणी थोडाफार पाऊस पडल्याने जे काही पेरण्या झाल्या होत्या अशा ठिकाणी दुबार पेरणीचे संकट येऊन ठेपले आहे.

परंतु आता बऱ्याच ठिकाणी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतीच्या कामांना देखील वेग आल्याचे दिसून येत आहे. तसे पाहायला गेले तर जून महिन्याचा शेवटचा आठवडा हा पावसाने जोर धरलेला दिसून आला. परंतु जुलै ची सुरुवात ही अपेक्षेपेक्षा खूप कमी प्रमाणात पावसाच्या हजेरीने झाली.

 येत्या चार ते पाच दिवसात या ठिकाणी होईल चांगला पाऊस

जर आपण राज्यातील कोकण विभागाचा विचार केला तर सध्या या ठिकाणी बऱ्यापैकी पाऊस सुरू असून हवामान विभागाने देखील कोकण विभागाला पावसाचा ऑरेंज अलर्ट  दिला आहे. तसेच पुढील काही दिवस या भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर विदर्भ आणि मराठवाड्याला देखील पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे.

दरम्यान पुणे वेधशाळेचे महासंचालक के.एस.होसाळीकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली असून त्यांच्या मते पुढील चार ते पाच दिवसांसाठी महाराष्ट्रातील कोकण व गोव्यापर्यंत चांगला पावसाचा अंदाज असून कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

तसेच देशाचा हवामान अंदाज पाहिला तर स्कायमेटने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील 24 तासांमध्ये केरळ राज्यात समाधानकारक पाऊस बरसण्याची शक्यता असून सिक्कीम, लक्षद्वीप  तसेच पश्चिम बंगालचा काही भाग, उत्तरप्रदेश,बिहार,आसाम, मेघालय आणि अरुणाचल प्रदेश या व इतर राज्यांमध्ये पावसाची हजेरी असणार आहे. तसेच गुजरातचा दक्षिण भाग व आंध्र प्रदेशाच्या किनारपट्टी भागात देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24