शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! मान्सूनच्या वाटचालीस पोषक हवामान, Mansoon 2024 ‘या’ तारखेला महाराष्ट्रात दाखल होणार

Tejas B Shelar
Published:
Monsoon News

Monsoon News : मे महिन्याचा पहिला पंधरवडा उलटला आहे. राज्यात सर्वत्र आगामी खरीप हंगामासाठी जय्यत तयारी सुरु झाली आहे. जमिनीच्या पूर्व मशागतीसाठी शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात धावपळ पाहायला मिळत आहे. जमिनीची पूर्व मशागत आणि बी बियाण्यांची खरेदी यासाठी शेतकऱ्यांची धावपळ पाहायला मिळत आहे.

तसेच, शेतकऱ्यांच्या नजरा आता मान्सून कडे लागल्या आहेत. मान्सूनचे आगमन कधी होणार याकडे शेतकऱ्यांचे मोठे बारीक लक्ष आहे. अशातच आता भारतीय हवामान खात्याने आगामी मान्सून संदर्भात मोठी अपडेट दिली आहे.

खरे तर नुकत्याच काही दिवसांपूर्वी भारतीय हवामान खात्याने यावर्षी मान्सून काळात चांगला पाऊस राहणार असा अंदाज दिला होता. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या मान्सून काळात यंदा सरासरीपेक्षा जास्तीचा पाऊस बरसणार असा अंदाज हवामान खात्याने दिला होता.

यानंतर आता भारतीय हवामान खात्याने मान्सूनचे आगमन नेमके कधी होणार यासंदर्भात माहिती दिली आहे. मान्सूनचे अंदमानात कधी आगमन होणार, केरळ आणि आपल्या महाराष्ट्रात मानसून कधी दस्तक देणार या संदर्भात देखील भारतीय हवामान खात्याने सविस्तर अशी अपडेट दिली आहे.

कधी होणार मान्सूनचे आगमन ?

हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे यंदा अंदमानात मान्सून वेळे आधीच दाखल होण्याची शक्यता आहे. यंदा मान्सूनचे 19 मे ला अंदमानात आगमन होऊ शकते. दरवर्षी अंदमानात 21 मे च्या सुमारास मान्सूनचे आगमन होत असते.

यंदा मात्र दोन दिवस आधीच मान्सूनचे अंदमानात पदार्पण होणार असा अंदाज आहे. विशेष म्हणजे केरळमध्ये देखील येत्या 13 ते 14 दिवसात अर्थातच 29 मे पर्यंत मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता आहे.

त्यापुढील दहा ते बारा दिवसात मान्सून आपल्या महाराष्ट्रात येणार आहे. अर्थातच दहा ते बारा जून पर्यंत मान्सूनचे महाराष्ट्रात आगमन होऊ शकते असे म्हटले जात आहे. तथापि मान्सून बंगालच्या उपसागरात आणि केरळात दाखल झाल्यानंतरच त्याच्या पुढील वाटचालीविषयी अंदाज बांधता येणार आहे.

म्हणजे केरळ आणि बंगालच्या उपसागरात मान्सून दाखल झाल्यानंतरच महाराष्ट्रात त्याचे आगमन कधी होणार आहे याबाबत योग्य तो अंदाज लावता येणार आहे.

म्हणजेच जून महिन्याच्या अगदी सुरुवातीलाच मान्सूनच्या महाराष्ट्र आगमनाची तारीख नक्की होऊ शकते अशी माहिती हवामान तज्ञांनी दिली आहे. तथापि आत्तापर्यंतचा हवामानाचा मूड पाहिला असता यंदा लवकरच मान्सून आगमन होऊ शकते असे भासत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe