Monsoon Vidarbha News : येत्या दोन दिवसांनी अर्थातच 19 मे 2024 ला मान्सूनचे अंदमानातं आगमन होणार आहे. रविवारी अंदमानात दस्तक दिल्यानंतर मान्सून केरळात पोहोचणार आहे मग तेथून पुढे मान्सून तळ कोकणात दाखल होईल. हवामान खात्याने यंदा केरळमध्ये मान्सूनचे 31 मे च्या सुमारास आगमन होणार असे म्हटले आहे.
असे झाले तर महाराष्ट्रात देखील मान्सूनचे आगमन वेळेतच अर्थातच 7 जून च्या सुमारास होऊ शकते असे म्हटले जात आहे. अशातच आता विदर्भात मान्सूनचे आगमन कधी होऊ शकते या संदर्भात महत्त्वाची माहिती समोर येत आहे.
खरे तर सध्या सर्वत्र मान्सूनच्या चर्चा पाहायला मिळत आहेत. शेतकऱ्यांसहित उकाड्याने हैराण झालेली जनता देखील मान्सून आगमनाची अगदी चातकाप्रमाणे वाट पाहत आहे.
मान्सूनचे वेळेत आगमन व्हावे आणि मान्सून काळात चांगला पाऊस व्हावा अशी साऱ्यांची इच्छा आहे. हवामान खात्याने यंदा मान्सून काळात चांगल्या पावसाची शक्यता देखील वर्तवली आहे.
अशातच मान्सून आगमनाची तारीखही समोर येत आहे. हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती तयार झाली असल्याने 19 मेला मान्सूनचे अंदमानात आगमन होणार आहे.
तसेच केरळात 31 मे च्या सुमारास आगमन होण्याची शक्यता आहे. तसेच, आगामी काळात कसल्याही अडथळ्याविना मॉन्सूनची प्रगती कायम राहिल्यास केरळ मध्ये आगमन झाल्यानंतर तेथून पुढे जवळपास दोन आठवड्यांनी विदर्भात Monsoon आगमन अपेक्षित आहे.
दरवर्षी 15 जूनच्या सुमारास विदर्भात मान्सूनचे आगमन होत असते. यावर्षी देखील या तारखेच्या आसपासच विदर्भात मान्सून धडकणार असे म्हटले जात आहे.
मात्र असे असले तरी मे च्या शेवटच्या आठवड्यातच मान्सूनचे विदर्भात कधी आगमन होणार याबाबत योग्य तारीख समोर येऊ शकणार आहे.यामुळे तोपर्यंत साऱ्यांनाच वेट अँड वॉच ची भूमिका घ्यावी लागणार आहे.
पण, गेल्या अनेक दिवसांपासून ज्या मान्सूनची वाट पाहिली जात होती, ज्या मान्सूनची आतुरता होती तो मानसून आता लवकरच महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे.
यामुळे लवकरच शेती कामांना वेग येणार आहे. मान्सून आगमना सोबतच खरीप हंगामातील पेरण्यांना देखील वेग येणार आहे.