Maharashtra Rain : मुंबई, ठाणे, पालघर, रायगडसह कोकण मधील अतिवृष्टीचा फटका शालेय विद्यार्थ्यांनाही ! पुन्हा ऑनलाइन शाळा

Ahmednagarlive24 office
Published:
Maharashtra Rain

Maharashtra Rain : गेल्या आठवड्यापासून सतत कोसळणाऱ्या अतिवृष्टीचा फटका शालेय विद्यार्थ्यांनाही बसू लागला आहे. हवामान खात्याकडून मुंबई, ठाणे, पालघर, रायगडसह कोकण विभागात देण्यात येत असलेल्या रेड, यलो अलर्टमुळे सातत्याने शाळा बंद ठेवाव्या लागत आहेत.

सलगच्या सुट्ट्यांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये होऊ नये म्हणून कल्याणमधील अनेक शाळांनी पुन्हा एकदा ऑनलाइन शाळा भरवल्याने कोरोनाच्या साथीनंतर विद्यार्थ्यांनाही घरीच अभ्यास करण्याचा अनुभव परत मिळाला.

कोकण विभागात गेल्या आठवड्यापासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे राज्य शासनातर्फे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून शाळांना सुट्टी जाहीर केली जात आहे. गुरुवारी आणि शुक्रवारी सलग दोन दिवस शाळांना सुट्टी देण्यात आली. नैसर्गिक आपत्ती हा जीवनाचा एक भाग आहे.

अशा प्रसंगावर मार्ग शोधत पुढे जायचे असते. याच हेतूने विद्यार्थ्यांचा शालेय अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करण्यासाठी कल्याणमधील शाळांनी पुन्हा एकदा ऑनलाइन शाळा भरवली.

विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता टिकून रहावी, अभ्यासात खंड पडू नये, आपल्या घरीच सुरक्षित राहून त्यांनी अभ्यास करावा, या उद्देशाने शालेय गणवेशात शाळेच्या वेळापत्रकाप्रमाणे ऑनलाइन शाळा भरवण्यात आल्याचे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

शिक्षकांनीही व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अभ्यास दिला. शाळा नसली तरीही शालेय गणवेशावर आपली मुले अभ्यास करत असल्याचे पाहून पालकांनाही या वेळी समाधान व्यक्त करत केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe