Weather Update : राज्यात होरपळ सुरू झाली असून, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात उच्चांकी तापमानाची नोंद होऊ लागली आहे.
मंगळवारी (दि.२६) राज्यात सर्वांत जास्त कमाल तापमान अकोला येथे ४१.५ अंश सेल्सिअस नोंदवले आहे. दरम्यान, पुढील पाच दिवसांत उन्हाचा पारा आणखी वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
निरभ्र आकाश आणि हवामान कोरडे असल्यामुळे कमाल तापमानात वेगाने वाढ होत आहे. राज्यातील अनेक शहरांचे तापमान ४० अंश सेल्सिअसच्या जवळपास आहे. मंगळवारी मध्य महाराष्ट्रात कमाल तापमानात किंचित वाढ झाली आहे,
तर विदर्भ व मराठवाड्यात कमाल तापमानात सरासरीच्या जवळपास आहे. मराठवाड्यात किमान तापमान लक्षणीय, तर उर्वरित भागात किंचित वाढ झाली आहे. येत्या २७ मार्च ते १ एप्रिलदरम्यान हवामान कोरडे राहणार आहे. राज्यात सर्वात कमी किमान तापमान पणे येथे १८.६ अंश सेल्सिअस इतके होते.
मंगळवारी पुणे येथे ३८.९ अंश सेल्सिअस इतके नोंदवले आहे. तर जळगाव येथे ४०.८, कोल्हापूर ३८.२, महाबळेश्वर ३३.३, मालेगाव ४१, नाशिक ३८.३, सांगली ३८.७, सातारा ३८.९, सोलापूर ४१.४, मुंबई ३१.४, अलिबाग २९.९, रत्नागिरी ३२.२,
डहाणू ३२.६, छत्रपती संभाजीनगर ३९.५, परभणी ४०.८, नांदेड ३९.८, बीड ४०.३, अकोला ४१.५, अमरावती ४०.४, बुलढाणा ४०.२, ब्रह्मपुरी ४०.१, चंद्रपूर ३८.६, गोंदिया ३८, नागपूर ३९, वाशीम ४१.४ तर वर्धा येथे ४०.५ अंश सेल्सिअस तापमान होते.