पंजाब डख हवामान अंदाज : पाऊस विश्रांती घेणार, अमावस्याला कसे राहणार महाराष्ट्रातील पाऊसमान ?

राज्यात पुन्हा एकदा पाऊस सुरू झाला असून आगामी काही दिवस महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने 25 तारखेपासून महाराष्ट्रात पावसाची तीव्रता आणखी वाढणार असे म्हटले आहे. दुसरीकडे पंजाबराव डख यांनीदेखील राज्यात 27 ऑगस्टपर्यंत पावसाची शक्यता वर्तवली आहे.

Updated on -

Panjab Dakh News : गेल्या एका आठवड्यापासून महाराष्ट्रात जोरदार पाऊस सुरू आहे. राज्याच्या बहुतांशी जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. खरंतर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात राज्यात चांगला पाऊस झाला. यानंतर मात्र पावसाने काही काळ विश्रांती घेतली. जवळपास सात-आठ दिवस पाऊस आलाचं नाही.

यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली होती. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात पावसाचा मोठा खंड पडला होता. यामुळे यंदाही पावसाचा मोठा खंड पडेल की काय ? अशी भीती शेतकऱ्यांना होती.

मात्र आता राज्यात पुन्हा एकदा पाऊस सुरू झाला असून आगामी काही दिवस महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने 25 तारखेपासून महाराष्ट्रात पावसाची तीव्रता आणखी वाढणार असे म्हटले आहे.

दुसरीकडे पंजाबराव डख यांनीदेखील राज्यात 27 ऑगस्टपर्यंत पावसाची शक्यता वर्तवली आहे. या कालावधीत राज्यात सगळीकडेच पावसाचा अंदाज आहे. मात्र काही जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण जास्त राहणार आहे.

कोकण, अहमदनगर, बीड, वैजापूर, पैठण, छत्रपती संभाजीनगर सारख्या भागांमध्ये या काळात पावसाचे प्रमाण जास्त राहील असे पंजाबरावांचे म्हणणे आहे. मात्र 28 तारखेपासून राज्याच्या हवामानात बदल होणार आहे.

28 पासून एक-दोन दिवस महाराष्ट्रात पुन्हा एकदा पाऊस गायब होणार आहे. 28 आणि 29 तारखेला महाराष्ट्रातील हवामान प्रामुख्याने कोरडे राहील असा अंदाज आहे. पण यानंतर पुन्हा एकदा पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होणार आहे.

अमावस्याला अर्थातच बैलपोळ्याच्या दिवशी महाराष्ट्रात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होण्याची शक्यता आहे. बैलपोळ्याला महाराष्ट्रात पाऊस पुन्हा कमबॅक करेल असे पंजाब रावांचे म्हणणे आहे.

यंदा 2 सप्टेंबरला बैलपोळा असून या दिवशी पुन्हा एकदा राज्यात पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होणार अशी शक्यता आहे. यामुळे राज्यातील प्रमुख धरणांमध्ये पाण्याची आवक आणखी वाढणार आहे.

गेल्या वर्षी राज्यात एल निनोच्या प्रभावामुळे दुष्काळ सदृश्य परिस्थिती तयार झाली होती. बहुतांशी भागांमध्ये सरासरी पेक्षा कमी पाऊस झाला होता. यंदा मात्र एलनिनोचा प्रभाव कमी झाला असून ला निनासाठी पोषक परिस्थिती तयार होत आहे.

हेच कारण आहे की यंदा मान्सून काळात महाराष्ट्रात चांगला पाऊस पडणार आहे. यानुसार सध्या राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस होत आहे. उर्वरित मान्सून मध्ये देखील महाराष्ट्रात चांगला पाऊस पडणार आहे. यामुळे यंदा शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळणार अशी आशा आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!