Panjabrao Dakh : पंजाबराव डख हे नाव महाराष्ट्रात नेहमी चर्चेत असते. पंजाबराव हे हवामानाचा अचूक अंदाज वर्तवतात. राज्यातील शेतकऱ्यांसाठी पंजाबराव डख हवामान अंदाज देत असतात. महत्त्वाचे म्हणजे राज्यातील शेतकऱ्यांचा त्यांच्या हवामान अंदाजावर मोठा गाढा विश्वास आहे. गेल्या वर्षी पंजाबरावांचे हवामान अंदाज सपशेल फोल ठरले होते.
यंदा मात्र पंजाबरावांचे बहुतांशी हवामान अंदाज खरे ठरलेत. काल पंजाबरावांनी असाच एक अंदाज वर्तवला होता. यामध्ये त्यांनी 2 सप्टेंबर पासून अर्थातच बैल पोळ्यापासून ते सहा सप्टेंबर पर्यंत राज्यात सर्व दूर जोरदार पावसाची शक्यता वर्तवली होती.
या काळात विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर अधिक राहणार असेही त्यांनी म्हटले होते. आता पंजाब रावांच्या याच हवामान अंदाजानुसार कालपासून महाराष्ट्रात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.
यामुळे पंजाब रावांचा हवामान अंदाज खरा ठरत असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. पंजाबरावांनी जसा सांगितला होता तसाच नदी-नाले ओसंडून भरून वाहतील असा पाऊस सध्या सुरु असून या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहेत.
राज्यात काही ठिकाणी अक्षरशा अतिवृष्टी सारखा पाऊस झाला असून पंजाबरावांच्या गावातही असाच पाऊस पाहायला मिळाला आहे. यामुळे स्वतः पंजाब रावांच्या सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे.
अतिवृष्टी झाल्याने त्यांचे सोयाबीन वाहून गेले आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात कालपासून जोरदार पाऊस सुरू आहे. काही भागात अतिवृष्टी होत आहे. परिणामी शेकडो हेक्टर जमीन पाण्याखाली गेली असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
मराठवाडा विभागातील परभणी जिल्ह्याच्या सेलू तालुक्यातील गुगळी धामणगाव येथील हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचंही सोयाबीन या अतिवृष्टीमुळे खरडून निघाले आहे. त्यांचे जवळपास सहा ते सात एकर जमिनीवरील सोयाबीन पीक या पावसामुळे खरडून निघालय.
यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांची सरकारने लवकरात लवकर पाहणी करावी आणि शेतकऱ्यांना मदत द्यावी असे आवाहन डख यांनी केले आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की पंजाब रावांनी 6 सप्टेंबर पर्यंत महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
या काळात उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पाऊस होईल आणि मराठवाड्यातील सर्वात मोठे धरण म्हणजे जायकवाडी धरण लवकरच 100% भरेल असे म्हटले आहे.
सध्या जसा पाऊस सुरू आहे ते पाहता पंजाबरावांचा अंदाज खरा ठरतोय असं म्हणायला काही हरकत नाही. मात्र या पावसामुळे स्वतः पंजाब रावांचे हे नुकसान झाले आहे.