Panjabrao Dakh Mansoon 2024 : आजपासून मे महिन्याला सुरुवात झाली आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू असलेले वादळी पावसाचे सत्र देखील आता थांबले आहे. मे महिन्याला सुरुवात झाली असल्याने आता मान्सूनची आतुरता लागली आहे. मोसमी पावसाला केव्हा सुरुवात होणार हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे.
अशातच भारतीय हवामान विभागाने यावर्षी मान्सूनचे वेळेआधी आगमन होऊ शकते असा अंदाज दिला आहे. यंदा प्रचंड उष्णता जाणवत असल्याने याचा परिणाम म्हणून समुद्रातील पाण्याचे वेगाने बाष्पीभवन होत असून यामुळे समुद्रावरील हवेचा दाब वाढत आहे.
सध्या समुद्रावरील हवेचा दाब 850 हेक्टोपास्कल एवढा असून जेव्हा हा हवेचा दाब 1000 हेक्टोपास्कल एवढा होईल तेव्हा मान्सून निर्मितीला सुरुवात होणार असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.
येत्या वीस दिवसात मान्सूनचे अंदमानात आगमन होऊ शकते असा अंदाज आयएमडीच्या माध्यमातून वर्तवण्यात आला आहे. दुसरीकडे जेष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी देखील मान्सून संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे.
काय म्हणतात पंजाबराव डख
पंजाब रावांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या वर्षी उन्हाळ्यात जास्त पाऊस होतो त्यावर्षी पावसाळ्यात कमी पाऊस पडत असतो. गेल्या वर्षी अशीच परिस्थिती होती अन उन्हाळ्यात जास्त पाऊस पडला होता आणि यामुळे गेल्या पावसाळ्यात कमी पाऊस झाला.
यंदा मात्र तशी परिस्थिती राहणार नाहीये. यामुळे यावर्षी मान्सून काळात चांगला पाऊस होणार असा अंदाज पंजाब रावांनी दिला आहे. सुरुवातीला महाराष्ट्रातील काही भागांमध्ये 12 ते 13 जून च्या आसपास मोसमी पावसाला सुरुवात होईल, असे पंजाब रावांनी म्हटले आहे.
पण, महाराष्ट्रात पेरणीयोग्य पाऊस हा 22 जून नंतरच पाहायला मिळणार आहे. 25 ते 27 जून दरम्यान महाराष्ट्रात पेरणीयोग्य पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील पेरण्या जूनच्या शेवटच्या आठवड्यातच होतील अशी माहिती पंजाबरावांनी दिली आहे.
दुसरीकडे अंदमानात 22 मे 2024 ला मान्सूनचे आगमन होणार असे त्यांनी सांगितले आहे. यंदा जुलै महिन्यात जास्तीच्या पावसाची शक्यता असून ऑगस्ट महिन्यात कमी पाऊस होणार आहे.
पण सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यात अधिकच्या पावसाची शक्यता जाणवत असल्याचे पंजाब रावांनी म्हटले आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात राज्यातील अनेक धरणे भरतील अशी आशा देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.