Panjabrao Dakh News : भारतीय हवामान खात्याचा नुकताच एक नवीन हवामान अंदाज समोर आला आहे. या नवीन अंदाजात हवामान खात्याने उद्यापासून महाराष्ट्रात पुढील तीन दिवस हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार असल्याचे म्हटले आहे. आज कोकणातील दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये आणि मध्य महाराष्ट्राच्या पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या घाटमाथा परिसरावर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.
मात्र उद्यापासून महाराष्ट्रात सर्व दूर हवामान प्रामुख्याने कोरडे राहील. एखाद्या ठिकाणी स्थानिक वातावरण होऊन पाऊस पडू शकतो मात्र या पावसाचा जोर फारच कमी राहील. पण, सोमवारपासून पावसाचा जोर वाढणार आहे.
सोमवारी गोंदिया आणि अकोला हे दोन जिल्हे वगळता विदर्भातील उर्वरित नऊ जिल्ह्यांमध्ये आणि खानदेशातील धुळे या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे.
भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानंतर आता शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे ते पंजाब रावांच्या हवामान अंदाजाकडे. अशातच पंजाबरावांनी शेतकऱ्यांसाठी एक नवीन अंदाज दिला आहे.
काय म्हणतात पंजाबराव
पंजाब रावांच्या नवीन हवामान अंदाजानुसार, महाराष्ट्रात उद्यापासून सर्वत्र पावसाची उघडीप राहणार आहे. तथापि आज आणि उद्या विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होणार असा अंदाज आहे.
उर्वरित महाराष्ट्रात मात्र उद्यापासून हवामान कोरडे होणार आहे. विदर्भात ही 14 तारखेपासून हवामान कोरडे राहील असे म्हटले जात आहे. महत्त्वाचे म्हणजे राज्यात जवळपास 19 ते 20 तारखेपर्यंत हवामान कोरडे राहणार असा अंदाज पंजाबराव यांनी दिला आहे.
मात्र तदनंतर महाराष्ट्रातील हवामानात बदल होईल आणि पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होईल असा अंदाज पंजाब रावांनी दिला आहे. 20 सप्टेंबर पासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा पाऊस जोर धरणार असे डख यांनी आपल्या नवीन हवामान अंदाजात स्पष्ट केले आहे.
यामुळे ज्या शेतकऱ्यांचे सोयाबीन काढणीसाठी तयार झाले असेल त्यांनी पावसाची उघाड असताना सोयाबीनची हार्वेस्टिंग पूर्ण करून घ्यावी आणि सुरक्षित ठिकाणी सोयाबीनची साठवणूक करून ठेवावी असे आवाहन पंजाबरावांच्या माध्यमातून यावेळी करण्यात आले आहे.