Panjabrao Dakh News : १ सप्टेंबर ते ३ सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्रात सर्व दूर मुसळधार पाऊस झाला आहे. प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ अन पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची तीव्रता अधिक पाहायला मिळाली. काही ठिकाणी अतिवृष्टी सारखा पाऊस झाला. यामुळे सर्वसामान्य जनजीवन विस्कळीत झाले आणि शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे देखील अतोनात नुकसान झाले आहे.
म्हणून आता पावसाने थोडा काळ विश्रांती घेतली पाहिजे अशी सर्वसामान्य शेतकऱ्यांची इच्छा आहे. अशातच आता जेष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी एक नवीन अंदाज दिला आहे.
पंजाब रावांनी वर्तवलेल्या नवीन हवामान अंदाजानुसार महाराष्ट्रात आता पावसाचा जोर कमी होणार आहे. 4 सप्टेंबर पासून ते 11 सप्टेंबर पर्यंत महाराष्ट्रात पावसाचा जोर कमीच राहील.
यंदा संपूर्ण गणेशोत्सवात पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता पंजाबरावांनी वर्तवली आहे. परंतु राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये या कालावधीत सुद्धा पाऊस बरसणार असे पंजाब रावांनी आपल्या नवीन बुलेटिन मध्ये स्पष्ट केले आहे.
काय म्हणालेत पंजाब डख
पंजाब रावांनी दिलेल्या माहितीनुसार, गणपतीच्या काळात महाराष्ट्रात पावसाचा जोर हा फारच कमी राहील. पण या काळात राज्यातील सोलापूर, लातूर, बीड, परभणी, नांदेड, यवतमाळ, हिंगोली, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, अकोला, बुलढाणा, जळगाव, धुळे, नंदुरबार या भागात पावसाचा अंदाज आहे.
विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र या भागातही पावसाचा जोर कमीच राहणार आहे. या काळात या जिल्ह्यांमध्ये सर्वदूर पाऊस नसेल तर भाग बदलत पाऊस पडणार आहे.
1 सप्टेंबर ते 3 सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्रात जसा मोठा पाऊस झाला होता तसा मोठा पाऊस गणपतीच्या दिवसांमध्ये पाहायला मिळणार नसल्याचा अंदाज पंजाब रावांनी वर्तवला आहे. आज, 4 सप्टेंबर पासून ते 11 सप्टेंबर पर्यंत राज्यातील पावसाचा जोर कमी राहील.
काही जिल्ह्यांमध्ये दुपारपर्यंत ऊन पडेल आणि त्यानंतर पाऊस होईल मात्र आता जसा नुकसानकारक पाऊस झाला होता तसा नुकसानकारक पाऊस या काळात होणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता करण्याचे काहीही कारण नसल्याचे पंजाब रावांनी आपल्या या नवीन अंदाजात स्पष्ट केले आहे.