Panjabrao Dakh News : आज पासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. गणरायाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर सध्या संपूर्ण देशभर आनंदाचे वातावरण पाहायला मिळतय. मुंबई, पुण्यात अन कोकणात दरवर्षी गणेशोत्सवाची मोठी धूम असते आणि यंदाही या भागात गणेश उत्सव मोठ्या आनंदात साजरा होणार आहे. अशातच आता जेष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचा एक नवीन हवामान अंदाज समोर आला आहे.
पंजाबरावांनी गणेशोत्सवाच्या काळात राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे. एक आणि दोन सप्टेंबरला महाराष्ट्रात जसा पाऊस झाला होता तसा पाऊस गणेशोत्सवाच्या काळात पडणार नाही मात्र राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता जाणवत आहे.
खरे तर दरवर्षी गणेशोत्सवाला महाराष्ट्रात पावसाची हजेरी लागत असते. यंदाही या काळात पाऊस बरसणार आहे. पंजाबरावांनी आपल्या नवीन हवामान अंदाजात दिलेल्या माहितीनुसार ज्यावर्षी महाराष्ट्रात बैलपोळ्याला जोरदार पाऊस पडत असतो त्यावर्षी गणरायाच्या आगमना वेळी महाराष्ट्रातील पावसाचा जोर हा कमी होतो.
यानुसार यंदा गणरायाच्या आगमनावेळी महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी राहणार असे दिसत आहे. कारण की यंदा बैलपोळ्याला राज्यातील बहुतांशी भागांमध्ये जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाचा पाऊस झाला आहे.
म्हणून राज्यातील काही जिल्हे वगळले तर राज्यात गणेशोत्सवाच्या काळात फारसा पाऊस पाहायला मिळणार नसल्याचा अंदाज समोर आला आहे. गणेशोत्सवाच्या काळात विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. गणरायाच्या आगमनापासून विदर्भातील 11 जिल्ह्यात पावसाला सुरुवात होणार आहे.
या भागात आजपासून म्हणजेच गणरायाच्या आगमनापासून ते पुढील पाच-सहा दिवस अर्थातच 12 तारखेपर्यंत पावसाची शक्यता आहे. या काळात विदर्भातील पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील सर्वच्या सर्व 11 जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. परंतु या काळात पाऊस दुपारनंतरच पडणार आहे.
तसेच एक आणि दोन सप्टेंबरला जसा पावसाचा जोर होता तसा पावसाचा जोर या काळात राहणार नसल्याने शेतकऱ्यांनी चिंता करण्याचे काहीही कारण नसल्याचेही पंजाब रावांनी स्पष्ट केले आहे. यासोबतच या नवीन हवामान अंदाजात पंजाबरावांनी परतीच्या पावसा संदर्भातही मोठी अपडेट दिली आहे.
मान्सूनचा परतीचा प्रवास कधीपासून सुरू होणार?
मान्सूनचा प्रतीचा प्रवास यंदा 20 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे. 20 सप्टेंबर पासून राजस्थानमधून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होणार असा अंदाज पंजाब रावांनी दिला आहे. पण आपल्या महाराष्ट्रातून परतीचा प्रवास उशिराने सुरू होईल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. भारतीय हवामान खात्याने देखील असेच म्हटले आहे. हवामान खात्याने यंदा 15 ऑक्टोबर पर्यंत राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.