Panjabrao Dakh News : महाराष्ट्रात सध्या पावसाची तीव्रता फारच कमी आहे. तथापि, भारतीय हवामान खात्याने आजपासून राज्यातील काही भागांमध्ये हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार अनंत चतुर्दशीच्या दिवसापासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होणार आहे.
आज पासून पाऊस सक्रिय होईल खरा मात्र पावसाची तीव्रता फारशी राहणार नाही असेही आयएमडीने आपल्या नवीन अंदाजातच स्पष्ट केले आहे. अशातचं ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी एक नवीन हवामान अंदाज जारी केला आहे.
या नवीन अंदाजात पंजाब रावांनी सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रात खूप मोठ्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रात मागे जसा पाऊस झाला होता तसाच मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होईल आणि काही ठिकाणी पूरस्थिती तयार होईल अशी भीती वर्तवली आहे.
कधीपासून सुरू होणार पाऊस?
पंजाब रावांनी सांगितल्याप्रमाणे, राज्यात 21 सप्टेंबर पासून पावसाला सुरुवात होणार आहे. यामुळे ज्या शेतकऱ्यांचे सोयाबीन, उडीद काढणीसाठी तयार झाले असेल त्या शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतीमालाची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक ठेवावे असे आवाहन केले जात आहे.
महाराष्ट्रात 21 सप्टेंबर पासून जोरदार पावसाला सुरुवात होईल आणि दोन सप्टेंबर पर्यंत पाऊस कायम राहणार आहे. हा पाऊस पूर्व विदर्भाकडून सुरू होईल मग पुढे पश्चिम विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा जोर वाढणार आहे.
21 सप्टेंबर पासून पावसाला सुरुवात होणार आहे मात्र पावसाचा जोर 23 ते 24 सप्टेंबर पासून वाढण्याची शक्यता आहे. पावसाचा जोर वाढल्यानंतर 2 ऑक्टोबर पर्यंत महाराष्ट्रात सर्व दूर चांगल्या मोठ्या पावसाची शक्यता आहे. या काळात राज्यात खूपच जोरदार पाऊस होणार असून अगदीच ओढे नाले भरून वाहणार आहेत.
एवढेच नाही तर शेतात पाणी घुसण्याची देखील शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान होऊ शकते. अशा परिस्थितीत ज्या शेतकऱ्यांचे सोयाबीन, उडीद यांसारखी पिके काढणीच्या अवस्थेत असतील त्यांनी लवकरात लवकर त्यांच्या पिकांची काढणी करून शेतीमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा असा सल्ला पंजाब रावांनी दिला आहे.