Panjabrao Dakh News : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. पंजाब रावांनी एक नवीन अंदाज दिला आहे. या नवीन हवामान अंदाजात त्यांनी मान्सूनचा परतीचा प्रवास कधीपासून सुरू होईल, आज आणि उद्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार, गणपतीच्या दिवसांमध्ये राज्यात पाऊसमान कसे राहणार? या बाबत सविस्तर माहिती दिली आहे. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया पंजाबरावांचा हा नवीन हवामान अंदाज.
आज आणि उद्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार?
आज 5 सप्टेंबर आणि उद्या 6 सप्टेंबर रोजी राज्यातील हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, अहमदनगर, जालना, छ.संभाजीनगर, नाशिक, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम या जिल्ह्यात भाग बदलत पाऊस पडणार आहे.
गणेशोत्सवाच्या काळात महाराष्ट्रातील पाऊसमान कसे राहणार?
पंजाबरावांच्या अंदाजा नुसार ज्यावर्षी पोळ्याला जास्त पाऊस पडतो त्यावर्षी गणरायाच्या आगमनावेळी महाराष्ट्रातील बहुतांशी भागांमध्ये पावसाचा जोर कमी असतो. जसं की आपणास ठाऊकच आहे की, यंदा पोळ्याला महाराष्ट्रात चांगलाच जोराचा पाऊस झाला आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी झाल्याचीही नोंद करण्यात आली आहे.
म्हणून यंदा गणरायाच्या आगमना वेळी राज्यात फारसा पाऊस राहणार नाही. गणरायाच्या आगमनावेळी आणि संपूर्ण गणेशोत्सवात महाराष्ट्रातील फक्त विदर्भ विभागातील पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील जिल्ह्यांमध्येचं पावसाची शक्यता आहे.
5 सप्टेंबर पासून ते 11-12 सप्टेंबर पर्यंत पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भातील 11 जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता राहणार असा अंदाज आहे. या जिल्ह्यात दररोज दुपारनंतर पावसाला सुरुवात होणार आहे.
मान्सूनचा परतीचा प्रवास कधीपासून सुरू होणार?
सप्टेंबर महिना सुरू झाला की सर्वसामान्य नागरिकांच्या माध्यमातून आता मान्सूनचा परतीचा प्रवास कधी सुरू होणार हा प्रश्न उपस्थित केला जातो. भारतीय हवामान खात्यानुसार यंदा मान्सूनचा प्रतीचा प्रवास हा उशिराने सुरू होणार आहे.
सप्टेंबरच्या अखेरीस मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होईल. यंदा ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत म्हणजेच 15 ऑक्टोबर पर्यंत पाऊस सुरू राहणार असा अंदाज आयएमडीने दिलाय.
पंजाब रावांनी मात्र 20 सप्टेंबर पासून राजस्थान मधून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होणार असे सांगितले आहे. मात्र त्यांनीही महाराष्ट्रातील परतीच्या पावसाला उशिराने सुरुवात होईल असे स्पष्ट केले आहे.