चक्रीवादळामुळे मान्सून रेंगाळणार…! आता ‘या’ दिवशी महाराष्ट्रात Monsoon सक्रिय होणार, पंजाबरावांचे मोठे भाकीत काय ?

Tejas B Shelar
Published:
Panjabrao Dakh News

Panjabrao Dakh News : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून दिवसाच्या कमाल तापमानात मोठी वाढ होत असल्याचे चित्र आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानकडून आपल्या महाराष्ट्राकडे उष्ण वारे दाखल होत आहेत. याचा परिणाम म्हणून राज्यात मोठी तापमान वाढ पाहायला मिळत असून यामुळे महाराष्ट्र भाजला जात आहे.

यामुळे मान्सून लवकरात लवकर सक्रिय झाला पाहिजे अशी बळीराजाची अन राज्यातील सर्वसामान्य नागरिकांची इच्छा आहे. दरम्यान भारतीय हवामान खात्याने मान्सून 31 मे ला केरळात दाखल होणार असा अंदाज व्यक्त केला आहे.

पण, अशातच बंगालच्या उपसागरात रेमन चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे. या चक्रीवादळामुळे मान्सूनच्या प्रवासावर विपरीत परिणाम होऊ शकतो अशी भीती देखील हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

यामुळे मान्सून आगमन लांबणीवर पडू शकते असे म्हटले जात आहे. अशातच आता जेष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी मान्सून संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या मान्सूनसाठी खूपच पोषक हवामान पाहायला मिळत आहे.

22 मेल ला मान्सूनचे अंदमानात आगमन झाले असून तेव्हापासून मान्सूनसाठी पोषक परिस्थिती आहे. यावर्षी 30 ते 31 मे च्या दरम्यान मान्सून केरळमध्ये सक्रिय होणार असा अंदाज डख यांनी व्यक्त केला आहे.

विशेष म्हणजे केरळमध्ये मान्सून सक्रिय झाल्यानंतर आपल्या महाराष्ट्रात देखील पावसाला सुरुवात होणार आहे. महाराष्ट्रात एक, दोन आणि तीन जून 2024 ला चांगला मोठा पाऊस होणार असा अंदाज पंजाब रावांनी दिला आहे.

परंतु जून महिन्याच्या सुरुवातीला होणारा हा पाऊस मोसमी पाऊस राहणार नसून पूर्वमोसमी पाऊस राहणार आहे. दुसरीकडे राज्यात आठ जूनला मान्सून सक्रिय होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

म्हणजेच महाराष्ट्रात मान्सून आगमन 8 जूनच्या सुमारास होणार असा अंदाज त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. ते म्हटले की यंदा मान्सून लवकरच महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता तयार होत होती. मात्र बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार झाले असल्याने यामुळे मान्सून काहीसा रेंगाळणार आहे.

तथापि यंदा मान्सून आठ जूनला महाराष्ट्रात दाखल होणार असा अंदाज त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. निश्चितच पंजाब रावांनी सांगितल्याप्रमाणे जर मान्सूनचे जूनच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटी आगमन झाले तर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मान्सूनचे वेळेत आगमन झाल्यास राज्यासहित संपूर्ण देशभरात पेरणीच्या कामांना वेग येणार आहे. मात्र पंजाब रावांनी जोपर्यंत एक वीत ओल जात नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांची पेरणी करू नये असे आवाहन केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe