हवामान

पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज आला ! महाराष्ट्रात आणखी ‘इतके’ दिवस सुरू राहणार वादळी पाऊस, डख नेमके काय म्हटलेत ?

Published by
Tejas B Shelar

Panjabrao Dakh News : सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सबंध देशभरात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अनेकांनी आपले नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख हे देखील खासदारकीच्या निवडणुकीत उभे राहिले आहेत.

पंजाबराव डख परभणी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी करत आहेत. त्यांना वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी दिली असून त्यांचे निवडणूक चिन्ह हे रोलर अर्थातच दबईयंत्र आहे. सध्या पंजाब डख पाटील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघात प्रचार करत आहेत.

त्यांचा प्रचार सुरू असला तरी देखील ते राज्यातील शेतकऱ्यांसाठी हवामानाचा अंदाज आधीप्रमाणेच देत आहेत. दरम्यान त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी काल अर्थातच 24 एप्रिल 2024 ला एक नवीन हवामान अंदाज जारी केला आहे.

या नवीन हवामान अंदाजात त्यांनी महाराष्ट्रात आणखी किती दिवस पाऊस सुरू राहणार ? कोणत्या भागात पाऊस पडणार याबाबत सविस्तर अशी अपडेट दिली आहे. दरम्यान आता आपण पंजाबरांचा हा नवीन हवामान अंदाज थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

काय म्हणालेत पंजाब डख ?

पंजाबराव यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात मराठवाड्यासहित संपूर्ण राज्यभर 26 एप्रिल पर्यंत भाग बदलत पाऊस पडण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे परभणी आणि जालना जिल्ह्यात 28 एप्रिल पर्यंत पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.

मात्र यानंतर राज्यावरील वादळी पावसाचे सावट दूर होणार आहे. 28 तारखे नंतर महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये तापमानाचा पारा वाढू शकतो असे पंजाबरावांनी म्हटले आहे.

राज्यातील तापमानाचा पारा 45 अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याची शक्यता असल्याने नागरिकांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. एकंदरीत महाराष्ट्रात पुढील चार दिवस पावसाची शक्‍यता आहे. यानंतर राज्यातील वादळी पावसाचे वातावरण ओसरणार आहे.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com