Panjabrao Dakh News : महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे. जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यात पावसाने जोरदार दणका दिल्यानंतर आता ऑगस्ट महिना देखील पाऊस गाजवणार आहे. भारतीय हवामान खात्याने 31 जुलैपासून ते तीन ऑगस्टपर्यंत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
या कालावधीत राज्यातील काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज आणि काही जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान आता ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी देखील ऑगस्ट च्या सुरुवातीला पावसाचा जोर वाढणार असल्याचे म्हटले आहे.
पंजाबरावांनी वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार, 31 जुलै ते 5 ऑगस्ट पर्यंत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये खूप मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
आता महाराष्ट्रात रिमझिम पाऊस पडणार नाही तर जोराचा पाऊस पडणार असा अंदाज आहे. या कालावधीत महाराष्ट्रात काही ठिकाणी कडक ऊन पडणार आहे. जिथे कडक ऊन पडणार त्या ठिकाणी चांगला पाऊसही पडणार आहे.
जुलै महिन्यात सांगली, सातारा, कोल्हापूर सहित पश्चिम महाराष्ट्रात पावसाने जोरदार दणका दिला आहे. मात्र आता उत्तर महाराष्ट्रात आणि पूर्व तसेच पश्चिम विदर्भात पावसाचा जोर वाढणार आहे.
कोणत्या भागात पडणार जोरदार पाऊस
पंजाब रावांनी पाच ऑगस्टपर्यंत चांगला मोठा पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे. आता रिमझिम स्वरूपाचा पाऊस बंद होणार आहे आणि मुसळधार पाऊस कोसळणार आहे. या काळात नदी-नाले भरून वाहतील असा पाऊस होणार आहे.
या कालावधीत राज्यातील विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र विभागात चांगला पाऊस पडणार आहे. नागपूर, वर्धा, अमरावती, अचलपूर, वाशिम, अकोला, अकोट, बुलढाणा, जालना, सिंदखेड राजा, सिल्लोड, वैजापूर, जळगाव, मालेगाव, नाशिक, नंदुरबार, धुळे, इगतपुरी, छत्रपती संभाजीनगर या भागात चांगल्या पावसाची शक्यता आहे.
मात्र 5 ऑगस्ट नंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा कडक ऊन पडणार आहे. 5 ऑगस्टनंतर दोन दिवस म्हणजेच सहा ते सात ऑगस्ट दरम्यान महाराष्ट्रात कडक ऊन पडेल आणि त्यानंतर म्हणजेच आठ तारखेनंतर पुन्हा एकदा पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होणार आहे.
आठ ते नऊ ऑगस्टपासून पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असे पंजाब रावांनी आपल्या नवीन बुलेटिन मध्ये स्पष्ट केले आहे. जुलै महिन्याप्रमाणेच ऑगस्टमध्येही चांगला पाऊस पडणार असे पंजाबरावांनी म्हटले आहे. खरे तर, गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात पावसाचा मोठा खंड पडला होता मात्र यावर्षी तशी परिस्थिती राहणार नाही असे डख यांनी म्हटले आहे.