Panjabrao Dakh News : राज्यातील शेतकऱ्यांसाठी आत्ताची सर्वात मोठी अपडेट समोर येत आहे. ही अपडेट आहे मोसमी पावसा संदर्भात. भारतीय हवामान खात्याने पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाल्याची माहिती दिली आहे. गेल्या एका आठवड्यापासून मानसून एकाच ठिकाणी मुक्कामाला होता. महाराष्ट्रात खानदेशमधील जळगाव आणि विदर्भातील अमरावतीमध्ये मान्सूनची सीमा पाहायला मिळत होती.
12 जून पासून मान्सून याच ठिकाणी रेंगाळत होता. मात्र काल मान्सून थोडा पुढे सरकला आहे. गोंदियापर्यंत मान्सूनची सीमा पोहोचली आहे. मान्सून पुढे सरकला असल्याने पावसाचा जोरही वाढू लागला आहे. काल राज्यातील कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर चांगला पाऊस झाला आहे.
विदर्भातही पावसाचा जोर वाढला आहे. ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबरावं डख यांनी देखील महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार असा अंदाज दिला आहे. पंजाब रावांनी दिलेल्या माहितीनुसार 22 जून ते 30 जून दरम्यान महाराष्ट्रात दररोज भाग बदलत जोरदार पाऊस पडणार आहे.
या कालावधीत मोठ्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पूर्व आणि पश्चिम विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण आणि उत्तर कोकणात या कालावधीत चांगला पाऊस होणार आहे.
म्हणजेच महाराष्ट्रात सगळीकडेच भाग बदलत चांगला जोराचा पाऊस पाहायला मिळू शकतो. दरम्यान 26, 27 आणि 28 जूनला महाराष्ट्रात खूप मोठ्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हे तीन दिवस पावसाचा सर्वाधिक जोर पाहायला मिळणार असा अंदाज पंजाबरावांनी वर्तवला आहे. हे तीन दिवस राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याने निश्चितच राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
खरंतर मान्सूनची वाटचाल रखडल्यानंतर महाराष्ट्रातील अनेक भागांमधील पावसाचा जोर कमी झाला होता. अनेक ठिकाणी पावसाची उघडीप पाहायला मिळत होती. परंतु आता पंजाबरावांनी पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असा अंदाज दिला आहे.
आज पासून 30 जून पर्यंत म्हणजेच जून महिन्याचा शेवटचा आठवडाभर महाराष्ट्रात चांगल्या पावसाची शक्यता आहे. एकंदरीत पंजाबरावांचा हा अंदाज खरा ठरला तर राज्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
तसेच ज्या भागात पेरणी झालेली नसेल त्या भागात या पावसामुळे पेरणीच्या कामांना वेग येण्याची शक्यता आहे. राज्यातील काही भागांमध्ये पेरणी झाली आहे, पण काही ठिकाणी पेरणीयोग्य पाऊस झाला नसल्याने पेरणी बाकी आहे. अशा भागात पावसाची आतुरतेने वाट पाहिली जात आहे.