Panjabrao Dakh News : येत्या तीन-चार दिवसात जून महिन्याला सुरुवात होणार आहे. म्हणजेच पावसाळा सुरू होणार आहे. मान्सूनचे आगमन अजून भारताच्या मुख्य भूमीत व्हायचे आहे. पण जून महिना सुरू झाला की साधारणपणे पावसाळ्याला सुरुवात झाली असेच बोलले जाते. परंतु मोसमी पाऊस कधी पडणार, महाराष्ट्रात मान्सूनच्या पावसाला कधी सुरुवात होणार हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसहित सर्वसामान्यांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान याच संदर्भात ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी मोठी माहिती दिली आहे. पंजाब रावांनी जारी केलेल्या हवामान अंदाजात पुढील महिन्याचे हवामान अर्थात जून महिन्याचे हवामान कसे राहणार? मानसून कसा राहणार महाराष्ट्रात मान्सूनच्या पावसाला कधी सुरुवात होणार? अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.
काय म्हटलेत पंजाबराव ?
ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, केरळमध्ये 30 ते 31 मे च्या दरम्यान मानसून आगमन होण्याची शक्यता आहे. म्हणजेच भारताच्या मुख्य भूमीत मान्सून 31 मे च्या सुमारास दाखल होणार आहे. केरळमध्ये मान्सून पोहोचला की आपल्या महाराष्ट्रात मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे.
एक जून ते पाच जून या कालावधीमध्ये महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे. मात्र हा मोसमी पाऊस राहणार नाही तर पूर्वमोसमी पाऊस राहील. पंजाबराव सांगतात की खरे तर जून महिन्यात जो पाऊस पडतो तो मोसमीच पाऊस असतो.
मात्र काही तज्ञ मान्सूनचे आगमन झाल्यानंतर पडणाऱ्या पावसालाच मोसमी पाऊस म्हणतात. यामुळे एक जून ते पाच जून दरम्यान पडणारा हा पाऊस पूर्व मोसमी पाऊस आपण म्हणू असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
तसेच पंजाबरावांनी शेतकऱ्यांना अधिकची माहिती देताना असे सांगितले की ज्या भागांमध्ये 15 ते 30 मे दरम्यान चांगला पाऊस झालेला असेल त्या भागात यंदा चांगल्या जोरदार पावसाची शक्यता आहे.
मात्र ज्या भागात 15 ते 30 मे दरम्यान चांगला पाऊस झालेला नसेल त्या ठिकाणी पावसाचे प्रमाण थोडेसे कमी राहू शकते. दरम्यान पंजाब रावांनी यंदा महाराष्ट्रात आठ जूनला मान्सून सक्रिय होणार असल्याचा अंदाज जारी केला आहे.
एकंदरीत जूनच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात मोठ्या पावसाची शक्यता आहे. एक ते पाच जून या कालावधीत उत्तर महाराष्ट्र, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा या भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
तसेच सहा जून ते नऊ जून या कालावधीत विदर्भात देखील मोठ्या पावसाची शक्यता आहे. पंजाबरावांनी यंदा मान्सून काळात चांगला पाऊस राहणार असा अंदाज दिला आहे.
जुलै महिन्यात जास्तीचा पाऊस, ऑगस्ट महिन्यात कमी पाऊस, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात जास्त पाऊस पडणार असा अंदाज पंजाब रावांनी दिला आहे.