Panjabrao Dakh News : बैलपोळा हा महाराष्ट्रातील एक मोठा सण आहे. राज्यासह सीमावर्ती भागात बैलपोळ्याला महत्त्व आहे. हा सण शेतकऱ्यांसाठी मोठा खास असतो. शेतकरी राजा बैलांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा करत असतो. या दिवशी बैलांना सजवले जाते, त्यांना कोणतेच काम लावले जात नाही, तसेच मंदिराच्या भोवती बैलांना प्रदर्शना मारायला लावतात.
हा सण फक्त बैलांचा असतो. या सणाला बैलांना मान आहे. खरे तर दरवर्षी बैलपोळ्याला महाराष्ट्रात जोरदार पाऊस हजेरी लावतो. यामुळे यंदाही बैलपोळ्याला पावसाची हजेरी लागणार का हा मोठा सवाल उपस्थित केला जात होता.
नवीन हवामान अंदाजामध्ये मोठी माहिती
दरम्यान याच संदर्भात जेष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी एक मोठी माहिती दिली आहे. यंदा बैलपोळ्याला महाराष्ट्रात पाऊसमान कसे राहणार यासंदर्भात ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबरावं डख यांनी आज वर्तवलेल्या आपल्या नवीन हवामान अंदाजामध्ये मोठी माहिती देण्यात आली आहे.
काय म्हणतात पंजाबरावं डख ?
पंजाबराव डख यांनी वर्तवलेल्या आपल्या नवीन हवामान अंदाजानुसार, आज पासून पुढील काही दिवस महाराष्ट्रात सगळीकडे जोरदार पावसाची शक्यता आहे. या कालावधीत राज्यातील बीड, छत्रपती संभाजी नगर, पैठण, अहमदनगर, वैजापूर, कोकणात पावसाची तीव्रता थोडीशी अधिक राहणार असे पंजाबरावांचे म्हणणे आहे.
28, 29 आणि 30 ऑगस्ट हवामान कोरड
तसेच पंजाब रावांनी 28 ऑगस्ट नंतर पावसाचा जोर थोडासा कमी होणार असाही अंदाज दिला आहे. 28, 29 आणि 30 ऑगस्ट रोजी राज्यातील हवामान कोरड राहू शकते असे पंजाबरावांचे म्हणणे आहे. मात्र बैल पोळ्याला पुन्हा एकदा महाराष्ट्रात पाऊस कमबॅक करणार आहे.
पोळ्याला चांगला पाऊस पडणार
अर्थातच दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी पोळ्याला चांगला पाऊस पडणार असा अंदाज आहे. खरे तर दरवर्षी बैलपोळ्याच्या दिवशी महाराष्ट्रातील बहुतांशी भागात पावसाची हजेरी पाहायला मिळते. बैलपोळ्याला हमखास पाऊस पडतो असे शेतकरी सांगतात.
मराठवाड्यात पावसाची शक्यता
दरम्यान, यंदाही बैलपोळ्याला पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तत्पूर्वी 22 ते 27 ऑगस्ट दरम्यान राज्यात सगळीकडे पावसाची शक्यता आहे. पंजाबरावांनी म्हटल्याप्रमाणे या कालावधीत राज्यातील कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे.
27 ऑगस्ट नंतर थोडेसे हवामान बदलणार
विदर्भातील पूर्वेकडील तसेच पश्चिमेकडील जिल्ह्यांमध्येही पावसाचा जोर कायम राहणार आहे. 27 ऑगस्ट नंतर थोडेसे हवामान बदलणार आहे. 28, 29 30 ला राज्यात पावसाचा जोर कमी होईल आणि हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मात्र सप्टेंबरच्या सुरुवातीलाच पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होईल आणि यंदा बैलपोळ्याला चांगला पाऊस पडेल असे पंजाबरावांचे म्हणणे आहे.