Panjabrao Dakh Update:- या हंगामामध्ये पावसाने महाराष्ट्रात हवी तेवढी हजेरी न लावल्यामुळे येणाऱ्या कालावधीत पाणीटंचाईची समस्या तीव्र होईल अशी शक्यता आहे. जुलै आणि सप्टेंबर महिन्याचा अपवाद वगळता जून आणि ऑगस्ट महिन्यात पावसाने शेतकऱ्यांची पार निराशा केली. त्यातच आता गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये भारतीय हवामान खात्याकडून मान्सूनने परतीचा प्रवास सुरू केला असल्याचे जाहीर केले आहे.
साधारणपणे सप्टेंबर महिन्याच्या 25 तारखेपासून पश्चिम राजस्थानमधून मान्सूनने परतीचा प्रवास सुरू केला असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून करण्यात आली होती व यानंतर संपूर्ण उत्तर भारतातून मान्सून माघारी फिरला आहे. तसेच राज्याचा विचार केला तर मध्य महाराष्ट्रातून मान्सूनने माघार घेतली असून मुंबई आणि कोकण या परिसरातून देखील येत्या दोन दिवसांमध्ये मान्सून माघारी फिरणार असून नऊ ऑक्टोबर म्हणजेच आजपासून मुंबई व संपूर्ण कोकणातून मान्सून माघारी फिरणार आहे.
परंतु या परतीच्या प्रवासामध्ये मुंबई आणि कोकणामध्ये काहीशी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच आता थंडीची चाहूल वाढली असून मराठवाडा, विदर्भ तसेच उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात येणाऱ्या काही दिवसांमध्ये थंडी वाढेल अशी शक्यता आहे. म्हणजेच येणाऱ्या काही दिवसांमध्ये मुंबई सह कोकणातील काही भागांमध्ये परतीचा पाऊस बरसेल आणि त्यानंतर मात्र महाराष्ट्रातील हवामान कोरडे होईल अशी साधारणपणे शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर आता सणासुदीचे दिवस सुरू होणार आहेत व जर आपण गणेश उत्सव कालावधीचा विचार केला तर यामध्ये महाराष्ट्रात बऱ्यापैकी पावसाने हजेरी लावली व दुष्काळाची परिस्थिती उद्भवण्याची शक्यता होती ती टाळण्यास तूर्तास तरी मदत झाली.
परंतु आता येणाऱ्या नवरात्र उत्सवाच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रात पावसाचे वातावरण कसे राहील किंवा दसऱ्याला चांगला पाऊस पडेल का? असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांना पडत आहेत. याबाबतीत शेतकऱ्यांमध्ये विश्वासाचे नाव असलेले पंजाबरावांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
काय सांगितले पंजाबराव डख यांनी?
याबाबत प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी महत्त्वाची माहिती देताना म्हटले की, राज्यामध्ये तीन आक्टोबरपासून पावसाने उघडीप घेतली असून आता जवळपास 25 ऑक्टोबर पर्यंत राज्यात मुसळधार पाऊस पडणार नाही. मात्र त्यानंतर राज्यात पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होण्याची शक्यता देखील त्यांनी वर्तवली आहे.
त्यामुळे 25 ऑक्टोबर ते पाच नोव्हेंबर या कालावधीमध्ये राज्यात पावसाची शक्यता देखील त्यांनी वर्तवली आहे. 15 ऑक्टोबर पासून घटस्थापनाच्या मुहूर्तावर नवरात्रोत्सवाची सुरुवात होत असून 24 ऑक्टोबर पर्यंत हा उत्सव साजरा केला जाणार आहे व
या तारखेला दसऱ्याचा सण देखील आहे. परंतु या कालावधीमध्ये राज्यात पाऊस पडणार नाही असा अंदाज पंजाबराव यांनी व्यक्त केला आहे.परंतु दसरा झाल्यानंतर मात्र दुसऱ्या दिवसापासून महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे असे मत देखील पंजाबराव यांनी व्यक्त केले आहे.
एवढेच नाही तर 10 नोव्हेंबर पासून दिवाळी सणाला सुरुवात होत असून यावर्षी देखील या कालावधीत चांगला पाऊस होईल असा देखील अंदाज पंजाबरावांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे येणाऱ्या कालावधीत पंजाबराव चा अंदाज कितपत खरा ठरतो हे येणारा काळच ठरवेल.