Panjabrao Havaman Andaj : राज्यातील शेतकऱ्यांसाठी आणि सर्वसामान्यांसाठी एक मोठी बातमी हाती आली आहे. ही बातमी आहे मान्सून संदर्भात. हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी मोसमी पावसाबाबत नवीन अंदाज दिला आहे. काल 27 ऑगस्ट 2024 ला पंजाबराव ने आपल्या आधिकृत यूट्यूब चैनलवर एक नवीन हवामान अंदाज दिला आहे.
यामध्ये पंजाबरावांनी ऑगस्टच्या शेवटच्या आणि सप्टेंबर च्या पहिल्या आठवड्यात पाऊसमान कसे राहणार या संदर्भात माहिती दिली आहे. त्यांनी म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्रात पुढील दोन-तीन दिवस पावसाचा जोर कमी राहणार आहे. तथापि 31 ऑगस्ट पर्यंत महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये भाग बदलत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पुढील काही दिवस महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण कमी राहणार असल्याने राज्यातील शेतकऱ्यांनी शेती कामे उरकून घ्यावीत असा सल्ला देण्यात आला आहे. प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी या काळात शेतीची कामे उरकून घ्यायला हवीत. कारण की 31 ऑगस्ट नंतर पुन्हा एकदा राज्याचे हवामान बदलणार आहे.
1 सप्टेंबर पासून ते 6 सप्टेंबर पर्यंत राज्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये पुन्हा एकदा मुसळधार पाऊस होणार आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात खूप मोठा पाऊस झाला होता. आता सप्टेंबर च्या पहिल्या आठवड्यात देखील महाराष्ट्रात मोठ्या पावसाची शक्यता आहे.
या कालावधीत राज्यातील नागपुर, गोंदिया, भंडारा, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, वाशिम, हिंगोली, यवतमाळ, अमरावती, अकोला, नांदेड, जळगाव जामोद, लातूर, जळगाव, बुलढाणा, उस्मानाबाद, धुळे, वैजापूर, कन्नड, नाशिक, संभाजीनगर, मालेगाव, सटाणा या भागात जोरदार पावसाची शक्यता आहे.
मात्र पश्चिम महाराष्ट्रात या काळात पावसाचा जोर कमी राहणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात अर्थातच पुणे,सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या भागात पावसाचा जोर कमी राहील असे पंजाबरावांचे म्हणणे आहे. उत्तर महाराष्ट्रात मात्र जोरदार पाऊस होणार आहे.सोबतच मराठवाडा आणि विदर्भ विभागातही जोरदार पावसाची शक्यता आहे.
मुंबई आणि कोकणातही या काळात मोठा पाऊस होणार असा अंदाज आहे. मुंबई आणि कोकणात अजूनही पाऊस सुरूच आहे. या भागात पुढेही असाच पाऊस सुरू राहणार आहे. खरे तर ऑगस्ट च्या सुरुवातीला महाराष्ट्रात जोरदार पाऊस झाला.
यानंतर पावसाने जवळपास सात आठ दिवस विश्रांती घेतली. यामुळे शेतकऱ्यांसहित सर्वसामान्य जनता चिंतेत आली होती. पण काही काळ विश्रांती घेतल्यानंतर पावसाने जोरदार पुनरागमन केले. राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस झाला. गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाचा जोर थोडा कमी झाला आहे.
तसेच पुढील काही दिवस महाराष्ट्रातील बहुतांशी भागांमध्ये पावसाचा जोर कमीच राहील असे म्हटले जात आहे. पण सप्टेंबर च्या सुरुवातीला पाऊस पुन्हा एकदा गती पकडणार आहे. एक सप्टेंबर ते सहा सप्टेंबर दरम्यान राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
यामुळे मराठवाड्यातील जायकवाडी धरण 5 सप्टेंबर पर्यंत 78 टक्के भरणार असा विश्वास पंजाब रावांनी व्यक्त केला आहे. सध्या जायकवाडी धरण 60 टक्क्यांच्या आसपास भरलेले आहे. पण लवकरच हे धरण 78 ते 80 टक्क्यांवर पोहोचणार असा विश्वास व्यक्त होत आहे.