महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाचे सत्र सुरुचं राहणार ; आज ‘या’ 11 जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता ! वाचा सविस्तर

Tejas B Shelar
Published:
Pre Monsoon Rain Maharashtra

Pre Monsoon Rain Maharashtra : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाचे सत्र सुरु असल्याचे पाहायला मिळतं आहे. या वादळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून आगामी खरीप हंगामासाठी शेतीची पूर्व मशागत करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेती कामांना सुद्धा खोडा बसत आहे. दुसरीकडे महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये उन्हाची तीव्रता वाढत आहे.

अनेक ठिकाणी उष्णतेची लाट येत आहे. दरम्यान आज देखील भारतीय हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता वर्तवली आहे तर काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येणार असा अंदाज आय एम डी च्या माध्यमातून समोर आला आहे.

आय एम डी ने आज मुंबई सह कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील ११ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे तर विदर्भातील तीन जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येणार असा अंदाज आहे. यामुळे या संबंधित जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

या वादळी पावसामुळे मुंबई सहित राज्यातील अनेक भागांमध्ये नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळणार आहे. मात्र या अवकाळी पावसाचा शेती पिकांवर आणि शेती कामांवर मोठा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज राज्याची राजधानी मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, कोल्हापूर, सातारा, नांदेड, लातूर, धाराशिव या 11 जिल्ह्यांमध्ये पूर्व मोसमी पावसाची शक्यता आहे.

या सर्व भागात मेघगर्जनेसह पाऊस पडेल असं हवामान विभागाने आपल्या नवीन बुलेटिन मध्ये सांगितलं आहे. तसेच विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.

काही भागात उष्णतेची लाट येणार आहे. चंद्रपूर, यवतमाळ, वाशीम अकोला, अमरावती या जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येणार अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

महाराष्ट्रात मान्सून कधी पोहोचणार ?

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, भारताच्या मुख्य भूमीत अर्थातच केरळमध्ये मान्सूनचे 31 मेला आगमन होणार आहे. म्हणजे येत्या चार दिवसात केरळमध्ये मान्सून पोहोचणार असा अंदाज आहे.

यानंतर दहा दिवसांनी अर्थातच 10 जूनच्या सुमारास मान्सूनचे कोकणासहित मुंबईत आगमन होण्याची शक्यता आहे. पुढे मानसून १५ जूनच्या सुमारास संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार असे म्हटले जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe