Maharashtra Rain Alert: राज्यभरात पावसाचा अलर्ट ! पहा तुमच्या जिल्ह्यात किती येणार ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Rain Alert : राज्यात ठिकठिकाणी ऑरेंज, रेड, यलो अॅलर्ट असून पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान, गुरुवारी कोकण, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी,

तर मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. कोकणात मान्सून अतिसक्रिय असून मध्य महाराष्ट्रातही तो सक्रिय आहे. त्यामुळे काही भागांत अतिवृष्टी झाली आहे. विदर्भ व मराठवाड्यातही पाऊस पडत आहे.

गुरुवारी सायंकाळपर्यंत कोकण भागातील मुंबईत १६ मिमी, सांताक्रुझ २०, अलिबाग २, रत्नागिरी ६, तर डहाणूमध्ये ०.५ मिमी पाऊस बरसला आहे. मध्य महाराष्ट्रातील पुण्यात ०.९ मिमी, लोहगाव ५, कोल्हापूर १७, महाबळेश्वर ३५, नाशिक २, सांगली २, सातारा १, तर सोलापूरमध्ये २ मिमी पावसाची नोंद झाली.

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरमध्ये १ मिमी, परभणी ०.१, नांदेडमध्ये ०.५ मिमी पाऊस पडला. विदर्भातील अकोलामध्ये २, तर चंद्रपूरमध्ये २ मिमी पावसाची नोंद झाली. घाटमाथ्यावरही जोरदार पाऊस पडत आहे. लोणावळ्यामध्ये २७३ मिमी,

शिरगाव २३०, शिरोटा १५६, ठाकूरवाडी ७६, वळवण २०, अम्बोणे २८०, भिवपुरी १९३, दावडी ३२०, डुंगरवाडी २९९, कोयना ३०७, खोपोली २९८, खंद २२३, ताम्हिणी ३५०, भिरा १९६, तर धारावीत ११६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. राज्यात २१ ते २४ जुलैदरम्यान कोकणात ऑरेंज, यलो अॅलर्ट असून या भागात जोरदार पाऊस, तसेच किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहणार आहे.