Rain Alert : महाराष्ट्रातील काही भागांमध्ये दिवसाचे कमाल तापमान 43 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहे. यामुळे उकाड्याने सर्वसामान्य जनता हैराण, परेशान झाली आहे. महाराष्ट्रावर सूर्यदेव कोपले असल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी उष्णतेची लाट आली आहे. विशेष म्हणजे आगामी काही दिवस महाराष्ट्रात उष्णतेची लाट कायम राहणार असा अंदाज आहे.
मात्र एकीकडे उष्णतेची लाट आली आहे तर दुसरीकडे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचे सत्र सुरू आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये वादळी पाऊस होत असून यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान होत आहे. दोन दिवसांपूर्वी राज्यातील काही भागांमध्ये गारपीट देखील झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापूर आणि सांगली या दोन जिल्ह्यात गारपीट झाल्याची नोंद करण्यात आली आहे. अशातच भारतीय हवामान खात्याचा एक नवीन अंदाज समोर येत आहे. आय एम डी ने दिलेल्या माहितीनुसार आज आणि उद्या महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता कायम राहणार आहे.
तसेच काही हवामान तज्ञांनी पुढील पाच दिवस महाराष्ट्रात भाग बदलत पाऊस पडत राहणार असे म्हटले आहे. पुढील पाच दिवस राज्यात उष्णतेची लाट, वादळी वारा, पाऊस आणि गारपीट पाहायला मिळणार असा अंदाज आहे. एकंदरीत राज्यात सध्या संमिश्र वातावरण तयार झाले आहे आणि आगामी काही दिवस असेच वातावरण पाहायला मिळू शकते.
कुठं बरसणार पाऊस ?
19 एप्रिल : भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आजारातच 19 एप्रिलला राज्यातील कोकण विभागातील दक्षिणेकडील सिंधुदूर्ग अन रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, बीड, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात विजा आणि मेघगर्जनेसह पाऊस बरसणार असा अंदाज आहे.
विशेष म्हणजे यातील काही भागात गारपीट देखील होऊ शकते असा अंदाज आयएमडीने यावेळी जाहीर केला आहे. दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यात हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज यावेळी आयएमडीच्या माध्यमातून वर्तवण्यात आला आहे.
20 एप्रिल : आयएमडीने म्हटल्याप्रमाणे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव या जिल्ह्यात उद्या अर्थातच 20 एप्रिल ला पावसाची शक्यता आहे. याशिवाय मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, लातूर, नांदेड या जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मराठवाडा विभागातील यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांध्ये सुद्धा काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. उद्या मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर काहीसा कमी राहणार आहे मात्र असे असले तरी सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस पडणार असे आयएमडीने यावेळी म्हटले आहे.