Maharashtra News : राज्यात उन्हाचा तीव्र चटका बसत आहे. शुक्रवारी (दि.५) राज्यात सर्वांत जास्त उच्चांकी कमाल तापमान सोलापूर येथे ४३.९ अंश सेल्सिअस नोंदविले आहे. विदर्भ व मराठवाड्यात उच्चांकी तापमानाची नोंद होऊ लागली आहे.
दरम्यान, पुढील चार दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस व गारपिटीचा, तसेच विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. भारतात सर्वांत जास्त उच्चांकी तापमान आंध्र प्रदेशातील नांद्याल येथे ४३.७ अंश सेल्सिअसवर होते,
पावसाला अनुकूल असलेला कमी दाबाचा पट्टा कार्यरत होत असल्यामुळे कोकण वगळता राज्यात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. काही भागांत सघ्या सकाळी काहीसा थंडावा जाणवत असला, तरी सरासरी तापमान वाढत आहे. कोकण वगळता राज्यातील अनेक भागांत कमाल तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या आसपास आहे.
मध्य महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाड्यात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. ६ एप्रिल रोजी कोकणात उष्ण ‘व दमट हवामान राहणार आहे. तर, विदर्भात उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. तर, ७ ते ९ एप्रिल रोजी मध्य महाराष्ट्र,
मराठवाडा व विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस व गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात सोसाट्याचा वारा वाहणार आहे. राज्यात सर्वांत कमी किमान तापमान नाशिक येथे १९.४ अंश सेल्सिअस इतके होते.
राज्यात शुक्रवारचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
पुणे ३९.६,अहमदनगर ३८.८, जळगाव ३७.९ , कोल्हापूर ४०.२, महाबळेश्वर ३३.६, मालेगाव ४०.८, नाशिक ३७.२, सांगली ४१, सातारा ३९.७, सोलापूर ४३.१, मुंबई ३२.५ ,अलीबाग ३४.१, रत्नागिरी ३३.५, डहाणू ३५.५ ,धाराशीव ४०.६, छत्रपती संभाजीनगर ३९.४, परभणी ४१.४ , बीड ४१.५, अकोला ४१.८, अमरावती ४०.६, बुलडाणा ३७.५, ब्रह्मपुरी ४२, चंद्रपूर ४२.४, गोंदिया ४०.३, नागपूर ४१.४, वर्धा ४२.१, यवतमाळ ४२.