हवामान

भारतीय हवामान विभागाने जाहीर केला मान्सूनचा दुसरा टप्प्याचा आणि ऑगस्ट महिन्याचा पावसाचा अंदाज! कसा राहील महाराष्ट्रात ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पाऊस?

Published by
Ajay Patil

यावर्षीच्या मान्सूनच्या हंगामामध्ये राज्यातील जवळपास बऱ्याच जिल्ह्यांमध्ये चांगल्या स्वरूपाचा पाऊस झाला व काही ठिकाणी तर पूरस्थिती निर्माण झाली व शेतीपिकांचे देखील अतोनात नुकसान झाले. अजून देखील महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण कमी असून धरणांमध्ये पाणीसाठा देखील कमी आहे.

साधारणपणे या जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये राज्याच्या बऱ्याच भागांमध्ये पावसाने धुमाकूळ घातला असुन राज्याच्या बऱ्याच भागांमध्ये पावसाने चांगल्या प्रकारे हजेरी लावल्याचे चित्र आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये पाऊस कसा राहील?

हा देखील एक सगळ्यांसमोर महत्त्वाचा प्रश्न होता व त्याबाबतच  महत्त्वाचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने आज जाहीर केला असून हा अंदाज मान्सूनच्या हंगामाच्या दुसऱ्या टप्प्याचा आणि ऑगस्ट महिन्याचा आहे. साधारणपणे जून आणि जुलै महिन्यामध्ये संपूर्ण देशात सरासरीपेक्षा जास्त प्रमाणामध्ये पाऊस पडला व हे प्रमाण सरासरीपेक्षा 1.8 टक्के इतके जास्त राहिले.

 ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये कसा राहील पाऊस?

याबाबत सविस्तर वृत्त असे की, भारतीय हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी या वर्षाच्या मान्सूनच्या  हंगामाच्या दुसऱ्या टप्प्याचा आणि ऑगस्ट महिन्याचा अंदाज आज जाहीर केला व त्यामध्ये त्यांनी सांगितले की जून आणि जुलै महिन्यात देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला व ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात सरासरी पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

एवढेच नाहीतर हवामान विभागाने येणाऱ्या ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात देशात सरासरी पेक्षा जास्त पाऊस पडण्याचा देखील अंदाज जाहीर केला आहे. संपूर्ण देशातील बऱ्याच भागांमध्ये या दोन्ही महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस राहील असे देखील शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

देशाच्या दृष्टिकोनातून लडाख, सौराष्ट्र तसेच कच्छ व मध्य भारताच्या काही भागांमध्ये मात्र सरासरी पेक्षा कमी पाऊस राहील असा देखील अंदाज वर्तवलेला आहे.

 ऑगस्टमध्ये पावसाचा खंड पडेल का?

हवामान विभागाने वर्तवलेल्या आजच्या अंदाजामध्ये म्हटले आहे की, ऑगस्ट महिन्यामध्ये देशात सरासरी पाऊस पडेल. परंतु देशातील काही भागांमध्ये मात्र सरासरीपेक्षा कमी पाऊस राहण्याचे देखील संकेत देण्यात आलेले आहेत.

महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून बघितले तर मराठवाडा आणि खानदेश व विदर्भाच्या अनेक भागांमध्ये ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.

सोबतच मध्य महाराष्ट्र व कोकणात सरासरी पाऊस पडेल असा देखील अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.एकंदरीत या अंदाजावरून दिसून येते की पुढील दोन महिन्यांमध्ये म्हणजेच ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पाऊस सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेली आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil